जामनेर(प्रतिनिधी)सोमेश्वर महादेव मंदिर जामनेर पुरा येथे, पुरातन मंदिर असून या ठिकाणी नेहमी धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात तसेच आज मंदिरावर गेल्या आठ दिवसांपासून महिला शिव सप्ताह चालू असुन आज,भोले बाबा च्या पालखी ची नगर प्रदक्षिणा जामनेर पुरा ते नगरखाना,जहागीरदार वड़ा,श्रीराम पेठ,कापड गल्ली,माळी गल्ली, गांधी चौक, राजमाता जिजाऊ चौक मार्ग शहरातील भागातुन फिरत असते यात विशेष महिलांचा मोठा सहभाग असतो. कार्यक्रमाचे आयोजन – सोमेश्वर भजनी मंडळ व महिला हरिपाठ मंडळ यांच्या वतीने केले जाते तसेच परिसरातील नागरिकही या मध्ये सहभागी होऊन मनोभावे आनंद घेत असतात.
Leave a Reply