जामनेर (प्रतिनिधी)मुंबई ग्रामपंचायत (सरपंच व उपसरपंच) निवडणूक नियम 1964 मधील तरतुदीन्वये दिनांक 01 जानेवारी 2024 ते मार्च 2025 या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींकरीता अनुसुचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग व सर्वसाधारण
प्रवर्गाकरीता ग्रामपंचायत निहाय सरपंच पदाचे आरक्षण निश्चित करणे व निश्चित केलेल्या सरपंच पदामधून महिलांसाठी (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग व सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांसह) राखुन ठेवण्याची कार्यवाही आज दिनांक 30/01/2025 रोजी तहसिलदार नानासाहेब आगळे यांचे अध्यक्षतेखाली पंचायत समिती सभागृहात सरपंच आरक्षण सोडत अंतिम आरक्षण खालीलप्रमाणे १.वाकी खुर्द – नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला २.जंगीपुरा -सर्वसाधारण
३.डोहरी -सर्व साधारण ४.वडगाव बु. – सर्व साधारण महिला ५.भारूडखेडा – अनु सूचित जमाती काढण्यात आली.या वेळी नायब तहसीलदार प्रशांत निंबोळकर यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Leave a Reply