संकटाच्या काळात विश्वासाचा आधार : मंत्री गिरीश भाऊ महाजन श्रीनगरमध्ये महाराष्ट्रातील पर्यटकांसोबत

जामनेर(प्रतिनिधी)महाराष्ट्र राज्याचे संकटमोचक मंत्री गिरीश भाऊ महाजन हे गेल्या तीन दिवसांपासून बॉम्बे हॉस्पिटल येथे उपचार घेत होते. मात्र, पहलगाम येथील भ्याड हल्ल्यात महाराष्ट्रातील नागरिकांना धीर देण्यासाठी, त्यांनी तात्काळ श्रीनगरला प्रस्थान केले आणि संकटाच्या काळात प्रशासनाच्या नेतृत्वाचे सर्वोत्तम उदाहरण ठेवले. त्यांच्या धाडसी निर्णयाचे संपूर्ण महाराष्ट्रात कौतुक होत आहे.

मंत्री गिरीश भाऊ महाजन यांनी जम्मू-कश्मीरमध्ये अडकलेल्या महाराष्ट्र राज्यातील पर्यटकांसाठी श्रीनगरमध्ये तातडीने धाव घेतली. परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी त्यांनी व्यक्तिगत सहभाग घेत, महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक नागरिकाला दिलासा आणि आश्वासन दिले.

जम्मू-कश्मीरमध्ये अडकलेले पर्यटक आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी महाराष्ट्र शासनाने तत्काळ पावले उचलली. यावेळी मंत्री गिरीश भाऊ महाजन यांनी श्रीनगरमधील विविध हॉटेल्समध्ये जाऊन, महाराष्ट्र राज्यातील अडकलेल्या पर्यटकांशी थेट संवाद साधला. त्यांना धीर देत, त्यांची चिंता समजून घेतली आणि खालील शब्दात आश्वासन दिले,
“महाराष्ट्र शासन तुमच्यासोबत खंबीरपणे उभे आहे. तुमची सुरक्षित घरी परतफेरी लवकरात लवकर सुनिश्चित केली जाईल.”

पर्यटकांच्या मनातील भीती आणि काळजी पाहून मंत्री महाजन यांनी त्वरित सर्व संबंधित यंत्रणांना निर्देश दिले. विशेष उड्डाणे सुरू करण्यात येनार असल्याचे सांगितले, तसेच आवश्यक त्या सर्व सुविधा आणि व्यवस्था तातडीने पुरविण्याचे नियोजन सुरू करण्यात आले आहे. मंत्री महाजन यांचा हा सक्रिय हस्तक्षेप पर्यटकांमध्ये विश्वास निर्माण करणारा ठरला.

मंत्री गिरीश भाऊ महाजन यांनी यावेळी सांगितले,
“संकटाच्या काळात महाराष्ट्र शासनाच्या प्रत्येक पावलामागे आपल्या नागरिकांची सुरक्षितता आणि कल्याण आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिक आमच्यासाठी महत्त्वाचा आहे, आणि त्यांच्या सुरक्षेसाठी आम्ही अखंड प्रयत्नशील आहोत.”

त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र शासनाने आपल्या नागरिकांना संकटाच्या परिस्थितीतही अत्यावश्यक मदतीची हमी दिली आहे. मंत्री गिरीश भाऊ महाजन यांच्या सक्रियतेमुळे आणि सकारात्मक दृष्टीकोनामुळे, अडकलेल्या पर्यटकांमध्ये आत्मविश्वास वाढला आहे.

या संकटाच्या काळात महाराष्ट्र शासनाची कार्यक्षमता आणि संवेदनशीलता पुनः एकदा सिद्ध झाली आहे. “संकटसमयीही आपल्या माणसांसाठी झटणारा प्रशासन” याचे ठळक उदाहरण राज्याने जगासमोर ठेवले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *