विद्युत तारेच्या शॉक लागून एक बिबट मादी मृतावस्थेत आढळल्याने खळबळ

जामनेर (प्रतिनिधी )तालुक्यातील मांडवे खुर्द शिवारातील गट नंबर 82 मध्ये एक बिबट मादी मृतावस्थेत आढळल्याने खळबळ उडाली आहे. दि. 26 रोजी भारुडखेडा-तोंडापूर रस्त्यावर सदाभाऊ रामभाऊ मोकासरे यांच्या शेतात ही घटना उघडकीस आली.त्याचे सविस्तर असे की, सदर घटनेची माहिती भ्रमणध्वनीद्वारे वनक्षेत्रपाल जामनेर, वनपाल, वनरक्षक गोद्री, वनरक्षक पठाड तांडा,आणि वनरक्षक पिंपळगाव यांना परिसरातील नागरिकांकडून मिळाली असता वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी तत्काळ दाखल झाले. त्यांनी सखोल चौकशी केली असता सदर ठिकाण वनक्षेत्रापासून ३ ते ४ किलोमीटर अंतरावर असल्याचे आढळून आले.मृत बिबट वनपरिक्षेत्र कार्यालय, जामनेर येथे आणण्यात आले. पशुवैद्यकीय अधिकारी संजय खाचणे आणि इतर दोन अधिकाऱ्यांनी शवविच्छेदन केले असता मृत बिबट हे साधारण ३ वर्षाचे मादी जातीचे असल्याचे त्यांनी सांगीतले. मृत बिबटच्या शरीरावर सर्व अवयव साबुत असल्याची माहिती त्यांनी दिली असून त्याचा मृत्यू विद्युत तारेच्या शॉक लागून झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मृत बिबटच्या शरीराचे विविध अवयव न्यायवैद्यक तपासणीसाठी सीलबंद करून पाठवण्यात आले असून अहवाल आल्या नंतर मृत्यूचे खरे कारण स्पष्ट होणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *