पुणे (संकेत सोनवणे)मानवतावादी आरोग्य क्षेत्रात कार्यरत असताना रेड स्वस्तिक सोसायटीच्या वतीने गेल्या २३ वर्षांपासून पुणे ते पंढरपूर दरम्यान जगद्गुरु तुकोबारायांच्या पालखीसोबत जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी सलग सेवा सुरू आहे.
याही वर्षी दिनांक २२ जून२५ पासून रेड स्वस्तिक सोसायटीच्या वतीने राष्ट्रीय अध्यक्ष मा.श्री. सुरेशराव कोते सह महाव्यवस्थापक श्री अशोक शिंदे, प्रसिद्ध उद्योजक सेवाभावी व्यक्तिमत्व म्हणून प्रसिद्ध असलेले रेड स्वस्तिक चे पुणे जिल्हाध्यक्ष श्री. संतोषभाऊ बारणे, डॉ. उमाकांत वाबळे, डॉ. मनोज ठाकरे, श्री. नंदूभाऊ रायगडे ,श्री. कमलेश राक्षे, डॉ. संतोष सुपे डॉ . सांडभोर डॉ. सौ स्मिताताई वाबळे, डॉ .सौ. सुपे, श्री. सचिन भामरे, सौ.भामरे ताई श्री. गुरुनाथ सोनवणे श्री.आमले यांच्या प्रमुख उपस्थितीत आरोग्य सेवेला प्रारंभ झाला. या वर्षी मानवतावादी आरोग्य सेवेच्या माध्यमातून
८३ हजार भाविकांना औषधोपचार पायांची मालिश यासह अनेक सेवा देण्यात आल्या.
दिनांक १ जुलै २५ रोजी जगद्गुरु तुकोबारायांच्या पालखीचा मुक्काम अकलूज येथे असताना रेड स्वस्तिक सोसायटीचे अखिल भारतीय अध्यक्ष तथा लिज्जत पापडचे महाव्यवस्थापक मा. श्री.सुरेश राव कोते, सह महाव्यवस्थापक श्री अशोक शिंदे, माजी जिल्हा व सत्र न्यायाधीश मा. श्री. बाळासाहेब पाटील, अभियंता मा.श्री सतीश सस्ते साहेब, रेड स्वस्तिक चे संचालक श्री.नंदू भाऊ रायगडे श्री. गुरुनाथ सोनवणे यांनी अकलूज येथे भेट दिली.
त्यावेळी स्मृती भवनात झालेल्या कार्यक्रमांमध्ये जगद्गुरु तुकोबारायांचे वंशज श्री.प्रशांत महाराज मोरे देहूकर व इतर मान्यवरांनी रेड स्वस्तिक सोसायटीचा यथोचित सन्मान केला.
त्यानंतर महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री व सहकार क्षेत्रातील अग्रगण्य नेतृत्व श्री.विजयसिंह दादा मोहिते पाटील यांच्या ” शिवरत्न” या निवासस्थानी आम्हा सर्वांना आमंत्रित करून रेड स्वस्तिकच्या मानवतावादी आरोग्य उपक्रमाचे मा.श्री.विजय दादा मोहिते पाटील साहेबांनी विशेष कौतुक केले. यांचे सह महाराष्ट्राचे क्रीडामंत्री ना.श्री. दत्तात्रय भरणे साहेब, रेड स्वस्तिक चे सदस्य दौंड चे आमदार श्री राहुलदादा कुल यांनी रेड स्वस्तिक सोसायटीच्या कार्याला शुभेच्छा दिल्या.
या आरोग्यवारीच्या उपक्रमासाठी मा. पोलीस महासंचालक व रेड स्वस्तिक चे संस्थापक मा.डॉ. श्री. टी एस.भाल यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष मा.श्री.अप्पासाहेब जे. एस.शिंदे ,मा.श्री. सुरेशराव कोते, मा.श्री. गांधी मा.श्री. अशोक शिंदे, मा.श्री.संतोष भाऊ बारणे मा.श्री.कमलेश राक्षे यांचे विशेष योगदान असते.
पंढरीच्या विठोबाची आस लागलेल्या वारकऱ्यांच्या आरोग्य सेवेपासून मालिश पर्यंत संपूर्ण सेवा देणाऱ्या रेड स्वस्तिकच्या टीमचे नेतृत्व रेड स्वस्तिक चे प्रकल्प संचालक श्री.संतोष राजगुरू, श्री.जयसिंगराव पवार साहेब, डॉ. दत्ता खुणे, ह.भ.प. श्रीकांत महाराज यांचे नेतृत्वाखाली श्री. वसंतराव गायकवाड श्री.नंदकुमार गावडे श्री.विजय पायमल्ले श्री.राजेंद्र बेडगे श्री.अप्पा अतकरे, श्री.भगवान मोटरकर श्री.माऊली जाधव यांचे सह अनेक मान्यवर प्रत्यक्ष सहभाग घेऊन सेवा देत आहेत.
या सर्व सेवा देणाऱ्या मान्यवरां बाबत रेड स्वस्तिक सोसायटी ला प्रचंड अभिमान आहे. कारण वारकऱ्यांना सेवा देऊन मानवतेची पूजा करणारा प्रकल्प या सेवाभावी मान्यवरांमुळे यशस्वी होत असल्याच्या प्रतिक्रिया अशोक एस.शिंदे राज्य सचिव तथा राष्ट्रीय सह महाव्यवस्थापक रेड स्वस्तिक सोसायटी मुंबई यांची आमच्या प्रतिनिधी जवळ बोलताना दिल्या.
Leave a Reply