जामनेर (प्रतिनिधी)मानवतावादी आरोग्य उपक्रमांच्या माध्यमातून देशभरातील ९५ लक्ष गरजवंतांना आरोग्य सेवा देणाऱ्या रेड स्वस्तिक सोसायटी च्या राष्ट्रीय मध्यवर्ती कार्यालयाचे दिनांक ८ डिसेंबर रविवार रोजी नागपुरात शानदार उद्घाटन भाऊसाहेब डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू तथा कस्तुरबा भवन नागपूरचे चेअरमन प्रोफेसर श्री.शरद निंबाळकर साहेब यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी मा.पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य, रेड स्वस्तिक चे महा व्यवस्थापक तथा संस्थापक मा. डॉ. टि.एस.भाल(आय पी एस) मा.श्री. घुगल साहेब मुख्य संचालक एनटीपीएस तथा माजी महाव्यवस्थापक आयडीबीआय बँक, इंडियन मेडिकल असोसिएशनचे माजी राज्याध्यक्ष डॉ. मिलिंद नाईक सर, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक मा.श्री मनपिया, रेड स्वस्तिक चे सहमहाव्यवस्थापक तथा राज्य सचिव श्री.अशोक शिंदे, महाराष्ट्र गांधी स्मारक निधी नागपूर समितीचे सचिव श्री सुनील पाटील,स्टेट बँकेचे माजी मुख्य व्यवस्थापक श्री प्रकाशराव आडेलकर मेहकर,रेड स्वस्तिक चे संचालक श्री. मोहन देशमुख सर, नागपूरचे जिल्हा सचिव तसा एनटीपीएस चे संचालक श्री गराड सर, श्री. सुभाषदादा डाबरे, श्री. सतीशराव घटाटे, श्री. शुक्लाजी, पोलीस उपाधीक्षक श्री. पांडुरंग सोनवणे, भंडारा तुमसर चे अध्यक्ष श्री.बमनोटे सर, मा. पोलीस उपाधीक्षक श्री गिरी सर, श्री मत्ते सर, एन टी पी एस चे श्री.छत्रे, श्री.डोरलीकर यांचे सह मैत्रेय संस्था, हिंदू रिसर्च फाउंडेशन, छत्रपती शिवाजी ब्रिगेड चे मान्यवर पदाधिकाऱ्यां सह नागपूर आणि परिसरातील अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.
यावेळी मार्गदर्शन करताना कुलगुरू प्रो. श्री. शरद निंबाळकर म्हणाले की रेड स्वस्तिक सोसायटी ही आरोग्य व शैक्षणिक क्षेत्रातील मानवतेला समर्पित आदर्श संस्था घटना समितीचे सदस्य भाऊसाहेब डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे विद्यार्थी असलेले डॉ. श्री टी. एस. भाल यांनी सुरू करून देशभर सेवेचा यज्ञ सुरू केला आहे याचा आम्हाला अभिमान वाटतो असे त्यांनी मनोगत व्यक्त करून रेड स्वस्तिक सोसायटी च्या आगामी उपक्रमाला शुभेच्छा दिल्या. या उद्घाटन सोहळ्याचे प्रास्ताविक श्री. अशोक शिंदे यांनी तर मनोगत व मार्गदर्शन डॉ.श्री. टि.एस.भाल यांनी केले.
कस्तुरबा भवन बजाज नगर नागपूर येथे झालेला हा शानदार सोहळा यशस्वी करण्यासाठी अनेक मान्यवरांनी परिश्रम घेतले
Leave a Reply