जामनेर(प्रतिनिधी)राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेत एकलव्य प्राथमिक शाळा जामनेरचे यश राष्ट्रीय परीक्षा परिषद नवी दिल्ली तर्फे इयत्ता आठवीच्या वर्गासाठी 22 डिसेंबर 2024 ला घेण्यात आलेल्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक प्रज्ञाशोध परीक्षेत एकलव्य प्राथमिक विद्यामंदिर जामनेर चे चार विद्यार्थी गुणवत्ता यादीत उत्तीर्ण झाले आहेत प्रत्येक विद्यार्थी 48 हजार रुपये शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरला आहे प्रज्ञाशोध परीक्षेत गुणवत्ता यादीत आलेल्या विद्यार्थ्यांना इयत्ता नववी पासून ते बारावीपर्यंत प्रतिवर्ष प्रत्येकी 12 हजार रुपये शिष्यवृत्ती मिळते गुणवत्ता यादीत आलेले विद्यार्थी भूषण सुनील महाजन रुचिका विजय सावकारे यश बाळू पाटील व आदिती किशोर पाटील यांचा मा. नगराध्यक्ष तथा संचालिका सौ.साधनाताई गिरीश महाजन ज्येष्ठ संचालक अँड श्री शिवाजी सोनार सचिव श्री कडू माळी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री देवीदास काळे व शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते
Leave a Reply