जामनेर /पहूर – जामनेर तालुक्यातील पहुर – कसबे गावाच्या प्रवेशद्वारापाशी वाघूर नदीच्या काठी २५ – १५ योजनेअंतर्गत सुरू असलेल्या ४५ लाखांच्या सार्वजनिक सभामंडपाच्या उभारणी संदर्भात वृत्त संकलनासाठी गेलेल्या पत्रकारास तेथे उपस्थित असलेल्या माजी पंचायत समिती सभापती तथा जय सप्तशृंगी मॉ निवासिनी ट्रस्टचे अध्यक्ष बाबुराव घोंगडे यांनी कामाविषयी उडवा -उडवीची उत्तरे देऊन सत्य दडपण्याचा प्रयत्न केला . वृत्त संकलनासाठी गेलेल्या पत्रकार शंकर रंगनाथ भामेरे यांचा मोबाईल फोन हिसकावून घेत व्हिडिओ शूटिंग बंद केली .
माजी सभापतींनी लोकशाहीचा आवाज दाबण्याचा केलेला प्रयत्न निंदनीय असून याप्रकरणी पत्रकार शंकर भामेरे यांनी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन सानप यांच्या सह जिल्हाधिकारी , जिल्हा पोलीस अधीक्षक , जिल्हा माहिती अधिकारी , लेखी निवेदन दिले आहे .
Leave a Reply