जामनेर(प्रतिनिधी)जामनेर येथील महाविद्यालया पासून तहसील कार्यालयावर सकल हिंदू समाजाच्या वतीने मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.बांगलादेश च्या निषेधार्थ घोषणा देत मोर्चा काढण्यात आला. गेल्या काही महिन्यांपासून बांगलादेशात अल्पसंख्यांक असलेल्या हिंदूंच्या मानवाधिकार, मालमत्ता आणि जीवांचे हनन झाल्याचे विविध प्रसार माध्यमांमधून निदर्शनास येते. बांगलादेशात गेल्या काही महिन्यांमध्ये हिंदू मंदिरांवर झालेले हल्ले, तोडफोड त्याचबरोबर हिंदू आबालवृद्ध आणि महिलांवर झालेले अमानवीय अत्याचार आणि त्यात सातत्याने होत असलेली वाढ ही गंभीर बाब असून अशाप्रकारच्या सर्व मानवाधिकारांचे हनन करणा-या वृत्तींना रोखण्यासाठी आपल्या स्तरावरून कार्यवाही व्हावी व अशा कार्यवाहीस आम्ही भारताचे हिंदु आपल्या सोबत ठामपणाने आहोत.निवेदनात आम्ही आपल्या हे नजरेस आणत आहोत की, अशाप्रकारे केलेल्या असहिष्णू आणि अमानवीय अत्याचारांमुळे बांगलादेशातील हिंदू समूदाय हा त्रस्त आणि व्यथित असून जगभरातील हिंदू समूदाय याची दखल घेत आहे. बांगलादेशात झालेल्या हया धार्मिक अत्याचारांमुळे बांगलादेशातील हिंदूंचे धार्मिक स्वातंत्र्य धोक्यात आले आहे आणि ह्या घटनांमूळे विभिन्न धर्मियांचे सहजीवन धोक्यात आल्याचे आणि बांगलादेश शासनाने त्याकडे जाणीवपूर्वक दूर्लक्ष केल्याचे स्पष्ट दिसते. अशा आशयाचे निवेदन जामनेरात सकल हिंदू समाजाच्या वतीने तहसीलदार यांना देण्यात आले. यावेळी श्याम चैतन्य बापू यांनी सकल हिंदू समाजाच्या मोर्चाला संबोधित केले.निवेदन देतेवेळी श्याम चैतन्य बापू,अँड.प्रमोद सोनार,शंभुशेट झवर,नानु शहा,सचिन गायकवाड ,भाजपा ता अध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, महेंद्र बावस्कर,श्रीराममहाजन,अतिश झाल्टेरवींद्र झाल्टे,कल्पेश भावसार, सौ.अंजूताई पवार ,सौ.आरती देशपांडे,सौ.गौरी लंगरे,कर्ण बारी,अदित्य देवरे, चेतन नेमाडे,जयवंत पर्वते ,राणाजी महाराज,शुभम माळी,धनंजय माळी, आदींसह हिंदू समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बांगलादेशात झालेल्या हिंदूंवरील अत्याचार अन्यायाच्या निषेधार्थ मोर्चा

Leave a Reply