जामनेर(प्रतिनिधी)सुसाशन सप्ताहाचे औचित्य साधून प्रशासन गावं की ओर या मोहिमेअंतर्गत सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय (तांत्रिक) जळगाव कार्यालयाने आज दि. 24/12/2024 रोजी जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील सर्व मत्स्यपालन सहकारी संस्थांचा कँप/ बैठक सागर फिश सेंटर, श्रीराम मार्केट , आठवडे बाजार, जामनेर येथे दुपारी आयोजित करण्यात आली. सदरहू कँप मध्ये केंद्र शासनाची किसान क्रेडिट कार्ड योजना, ई-श्रम कार्ड, अपघात गट विमा योजना व नॅशनल फिशरिज डिजिटल प्लॅटफॉर्म ( NFDP) या केंद्र शासनाच्या पोर्टलवर जिल्ह्यातील मच्छिमारांना नोंदणी करणेबाबत संस्थांना पुनश्च अवगत करून त्यांना तांत्रिक मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय जळगांव कार्यालयाच्या वतीने श्री. तुषार वंजारी, कनिष्ठ लिपिक, तसेच CSC चे श्री. जगदीश बैरागी यांनी तालुक्यातील उपस्थित सर्व मच्छीमार सहकारी संस्थांचे अध्यक्ष/ सचिव/ पदाधिकारी यांना मार्गदर्शन केले.
प्रशासन गावं की ओर” अंतर्गत मत्स्यव्यवसाय विषयक जामनेर तालुकास्तरिय शिबीर संपन्न.

Leave a Reply