पोलीस अत्याचारा विरोधात भगवान सेनेचे निवेदन

जामनेर (प्रतिनिधी)श्री संजय भास्कर शिरसाट अधिवक्ता हे छ संभाजीनगर येथे गेली 13 दिवसापासून शांततेत आमरण उपोषण करत होते परवा रात्री उशिरा सिटी चौक पोलीस ठाण्याचे सुमारे ४० ते ५० पोलीस कर्मचारी घटनास्थळी आले. उपोषण पूर्णतः शांततामय असतानाही, पोलिसांनी निर्घृण मारहाण करून, कपड़े फाडून जबरदस्तीने ताब्यात घेतले, आणि नंतर त्यांच्या इच्छेविरुद्ध घाटी रुग्णालयात TB च्या जनरल वार्डात दाखल केले. त्यांच्याकडे आर्मी इन्शुरन्स मेडिकल पॉलिसी (ECHS) असून उपचार कुठे घ्यायचा हे ठरवण्याचा त्यांचा कायदेशीर व वैयक्तिक अधिकार आहे. हा संपूर्ण प्रकार जाणीवपूर्वक, जबरदस्तीचा आणि भारताच्या राज्यघटनेतील कलम १९ व २१ मध्ये दिलेल्या शांततामय आंदोलनाचा व वैयक्तिक स्वातंत्र्याचा अधिकाराचा उघड भंग आहे. आम्ही या पोलीसांच्या दडपशाही व अमानवी वागणुकीचा तीव्र निषेध करतो सिटी चौक पोलीस ठाण्यातील जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी करतो. अशा प्रकारचा राज्यसत्तेच्या दुरुपयोगातून केलेला हिंसाचार लोकशाही व्यवस्थेत कधीही सहन करता कामा नये. त्यामुळे आम्ही मागणी करतो की या घटनेची स्वतंत्र चौकशी करण्यात यावी; या घटनेत सहभागी जबाबदार पोलीस अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी सर्व शांततामय आंदोलनकर्त्यांच्या सुरक्षेची व वैद्यकीय स्वातंत्र्याची हमी देण्यात यावी. न्यायाचा आवाज दडपला जाऊ नये सत्य आणि राज्यघटनेचे मूल्य यांचे रक्षण झाले पाहिजे. भगवान सेना जामनेर तालुका मार्फत निषेध नोंदवुन उचीत कार्यवाही करण्याची मागणी तहसीलदार श्री.नानासाहेब आगळे यांना निवेदन देण्यात आले प्रसंगी भगवान सेनेचे दत्तात्रय नामदेव पाटील,वसंत झिपरू व्यवहारे,मोतीलाल रामदास घ्यार,भगवान सेना जिल्हाध्यक्ष किशोर पाटील,पांडुरंग नामदेव घ्यार,पुंडलिक रामदास पढार,भगवान सेना तालुका अध्यक्ष गजानन वासुदेव ध्यार, खजिनदार संदीप रामदास काळे,मोयखेडा दिगर अध्यक्ष गजानन नामदेव पढार,संघटक सचिन मनोज थोरात,योगेश सुभाष नाईक,सुनील शंकर पालवे, राजेश लक्ष्मण कापसे समाज बांधव उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *