जामनेर (प्रतिनिधी)राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण नवी दिल्ली, महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण जळगाव, जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव, तालुका वकील संघ पाचोरा, विधी सेवा समिती पाचोरा यांचे संयुक्त विद्यमाने आज पाचोरा येथे “विधी सेवा महाशिबिर” कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
महाशिबिराचे उद्घाटन सन्माननीय पालक न्यायमूर्ती श्री. अभय एस. वाघवसे यांचे शुभहस्ते संपन्न झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश जळगाव मा. श्री. एम. क्यू. एस. एम. शेख हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हाधिकारी श्री. आयुष प्रसाद, पालक सदस्य महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिल ऍड. अमोल सावंत, पोलीस अधीक्षक जळगाव डॉ. महेश्वर रेड्डी यांची उपस्थिती होती.”विधी सेवा महाशिबिर” कार्यक्रमात महसूल विभागाचे पुरवठा, संगायो, निवडणूक, विविध दाखले, पीक पाहणी, 7/12 असे विविध विभागाचे स्टॉल उभारून नागरिक यांना शासकीय योजनाची माहिती देऊन लाभार्थी यांना प्रातिनिधीक स्वरूपात लाभाचे सेवेचे वितरण करण्यात आले.महाशिबिराच्या यशस्वीतेसाठी श्री. एस. पी. सय्यद, सदस्य, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण जळगाव, उपविभागीय अधिकारी पाचोरा श्री. भूषण अहिरे, तहसीलदार श्री. विजय बनसोडे, अध्यक्ष तालुका विधी सेवा समिती पाचोरा श्री. जी. बी. औंधेकर, अध्यक्ष तालुका वकील संघ पाचोरा ऍड. प्रवीण बी. पाटील यांनी नियोजन केले.
Leave a Reply