जामनेर(प्रतिनिधी)जामनेर तालुक्यातील मौजे हिंगणे बुद्रुक तालुका जामनेर येथील प्रगतिशील शेतकरी जगदीश राजेंद्र सूर्यवंशी यांच्या शेतात महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या वतीने पंजाबराव देशमुख सेंद्रिय शेती मिशन योजनेअंतर्गत गावपातळीवरील शेतकरी प्रशिक्षण वर्गाचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते सदर प्रशिक्षणासाठी तालुका कृषी अधिकारी जामनेर यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळ कृषी अधिकारी नेरी एस.ओ.अहिरे,कृषी पर्यवेक्षक नकुले,कृषी सहाय्यक मिलिंद पाटील, कृषी सहाय्यक राहुल बावस्कर,गोंडखेल तालुका जामनेर येथील विषमुक्त नैसर्गिक व सेंद्रिय शेती करणारे प्रगतिशील शेतकरी संग्रामसिंग राजपूत, हिंगणे गावातील प्रगतिशील शेतकरी अनिल चौधरी तसेच हिंगणे बुद्रुक गावाचे सरपंच प्रशांत पाटील उपस्थित होते.
सदर प्रशिक्षणाचे प्रस्ताविक मिलिंद पाटील कृषी सहाय्यक हिंगणे बुद्रुक यांनी केले.मंडळ कृषी अधिकारी नेरी एस.ओ अहिरे यांनी उपस्थित शेतकऱ्यांना नैसर्गिक शेती व सेंद्रिय शेती ही काळाची गरज असल्याने सेंद्रिय शेतीचे महत्त्व विशद करून अनमोल असे मार्गदर्शन केले तसेच हिंगणे बुद्रुक येथील प्रगतिशील शेतकरी अनिल चौधरी यांनी सेंद्रिय शेतीचे फायदे व महत्त्व याबाबत उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले तसेच गोंडखेड तालुका जामनेर येथील गेल्या 15 वर्षापासून विषमुक्त व नैसर्गिक सेंद्रिय शेती करणारे प्रगतिशील शेतकरी संग्रामसिंग जगतसिंग राजपूत यांनी बायोडायनिक डेपो बी.डी.कंपोस्ट खत कशा पद्धतीने तयार केले जाते याबाबत सविस्तर माहिती देऊन उपस्थित शेतकऱ्यांना डेपो कशा पद्धतीने तयार करावयाचा याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक करून त्याचा वापर कशा पद्धतीने करायचा याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले नंतर कृषी पर्यवेक्षक नकुले यांनी कृषी विभागाच्या विविध योजनांची उपस्थित शेतकऱ्यांना माहिती दिली शेवटी कृषी सहायक राहुल बावस्कर यांनी सदर कार्यक्रमात उपस्थित शेतकऱ्यांचे आभार प्रदर्शन करून आभार व्यक्त केले व कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला
Leave a Reply