जामनेर(प्रतिनिधी) ना. गिरीश महाजन यांना महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री पद मिळाल्याबद्दल जामनेर तालुका भटक्या विमुक्त बहुजन संघाच्या वतीने उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना मायेची उब म्हणून शाल वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला. संकट मोचक ना. गिरीश महाजन यांची रुग्णसेवा सर्व महाराष्ट्रासाठी प्रेरणादायी आहे जे का रंजले गांजले त्याशी म्हणावे जो आपुले यानुसार ते अहो रात्र रुग्णसेवा आणि समाजसेवा करत आहेत त्यांना पुनश्च कॅबिनेट मंत्रीपद मिळाल्याबद्दल रुग्णांना शाल वाटप चा उपक्रम भटके विमुक्त बहुजन संघ जामनेर तालुका शाखेच्या वतीने राबविण्यात आला याप्रसंगी भाजपा युवा जिल्हाध्यक्ष निलेश चव्हाण संघटनेचे जामनेर तालुकाध्यक्ष श्रावण जाधव रुग्णालयाचे डॉक्टर जितेंद्र वानखेडे पत्रकार मिलिंद लोखंडे मनोज दुसाने धनराज कोळी राजू पाटील दर्शन हंजकर राहुल जाधव आदी उपस्थित होते.
ना. गिरीश महाजन यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळाल्याबद्दल जामनेर तालुका भटक्या विमुक्त बहुजन संघाच्या वतीने रुग्णांना शाल वाटप.

Leave a Reply