नशीब बलवत्तर म्हणून वाचले दोन जणांचे प्राण पंचायत समिती इमारत पाडताना घडली दुर्घटना

oplus_2

जामनेर-(प्रतिनिधी)- येथील वाकी रोडवरील सुमारे शंभर वर्षांपूर्वीची जुनी पंचायत समिती इमारत पाडण्याचे काम सुरू असताना चार वाजेच्या सुमारास इमारत कोसळून दोन मजूर मलब्याखाली दबून मोठी दुर्घटना घडली. मात्र प्रशासकीय यंत्रणेच्या सतर्कतेने या मजुरांना बाहेर काढण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू झाले या दोघेही मजुरांना तीन तासाच्या परिश्रमाने सुखरूप बाहेर काढण्यात प्रशासनाला यश आले आहे.

oplus_2

याबाबत सविस्तर वृत्त असे की जामनेर पंचायत समितीची बाकी रोडवरील जुनी इमारत पाडून त्या ठिकाणी अद्ययावत पशुवैद्यकीय दवाखाना बांधण्याचा प्रस्ताव मंजूर असून डीपीतून 3 कोटी 80 लाख या पशुवैद्यकीय दवाखान्यासाठी शासनाने मंजूर केले आहे .यासाठी गेल्या आठ दिवसापासून ही इमारत पाडण्याचे काम सुरू होते. आज चार वाजेच्या सुमारास या इमारतीच्या दरवाजे खिडक्या पाडण्यासाठी गोपीचंद तवर ,भोजू तवर ,प्रतीक तवर सर्व राहणार डोहरी तांडा व जगदीश राठोड नागणचौकी, अभिषेक विश्वकर्मा असे सात मजूर

oplus_2

काम करीत असताना दुसरीकडे वरच्या मजल्यावर पोकलेन च्या साह्याने इमारत पाडण्याचे काम सुरू असताना इमारत छता सह कोसळली. मात्र मध्ये काम करणारे सात पैकी पाच मजूर बाहेर पळाले दोन मजूर मलब्याखाली अडकल्याने गंभीर जखमी झाले.घटनेची माहिती कळताच तहसीलदार नानासाहेब आगळे, पोलीस निरीक्षक मुरलीधर कासार, गटविकास अधिकारी श्रीकृष्ण इंगळे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे आर डी पाटील, कासकर यांच्यासह सर्व पोलीस स्टॉप सर्व नगरपालिका कर्मचारी, शिक्षण संस्थेचे सचिव जितेंद्र पाटील, भाजपाचे ज्येष्ठ नेते जे के चव्हाण भाजपा तालुकाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर , माजी उपनगराध्यक्ष महेंद्र बाविस्कर ,गटनेते डॉक्टर प्रशांत भोंडे, यांच्यासह इतर राजकीय पक्षाचे

oplus_2

पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्ते घटनास्थळी धावून मदत कार्य सुरू झाले. नगरपालिकेने जेसीपीच्या सहाय्याने ढिगारा उपसण्याची सुरुवात केली. मलब्याखाली दबलेल्या अभिषेक विश्वकर्मा, भोजू तवर दोघांना अखेर सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. मात्र दोघेही मजूर गंभीर जखमी अवस्थेत असून त्यांना उपचारासाठी जामनेर उपजिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले होते त्यांना पुढील उपचारासाठी जळगाव येथे हलवण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *