ज्ञानगंगा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात शिक्षक-पालक सभा संपन्न

जामनेर (प्रतिनिधी)श्री ज्ञानगंगा बहुउद्देशीय शिक्षण प्रसारक मंडळ संचलित ज्ञानगंगा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय शिवाजीनगर जामनेर येथे आज दिनांक २६-०६-२०२५ वार गुरूवार रोजी सकाळी ठीक १०.३०वाजता *शिक्षक पालक सहविचार* सभा आयोजित करण्यात आली. शिक्षक-पालक सभेचे कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य श्री राजेंद्र सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली सभा घेण्यात आली. त्यावेळी व्यासपीठावर पालक प्रतिनिधी सौ. ज्योत्स्ना पाटील , श्री संजय गायकवाड, शिक्षक प्रतिनिधी श्रीमती मनिषा भारंबे, श्री विजय कोळी,श्री राहुल महाजन उपस्थित होते.त्यावेळी विद्यालयाचे प्राचार्य श्री राजेंद्र सोनवणे यांच्या शुभ हस्ते हस्ते शिक्षणाचे आराध्य दैवत सरस्वती मातेचे प्रतिमा पूजन व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.


🔸सभेमध्ये विविध विषय मांडण्यात आले.शालेय व सेमी वर्गाची फी,आधार अपडेट,विविध शिष्यवृत्ती, विद्यार्थ्यांची गुणवत्ता, उपस्थिती, स्वच्छता, आरोग्य तपासणी, शारीरिक व बौद्धिक,विकास कसा साधता येईल या विषयावर चर्चा करण्यात आली. त्यावेळीअध्यक्षीय भाषणात विद्यालयाचे प्राचार्य,श्री.आर.जे.सोनवणे यांनी विद्यार्थी सुरक्षा समिती,महिला तक्रार निवारण समिती तसेच विविध समित्या व शिष्यवृत्ती लाभाच्या योजना संदर्भात पालकांना समुपदेशन केले. तसेच शाळेची गुणवत्ता व विद्यार्थ्यांची उपस्थितीचे प्रमाण वाढण्यासाठी व आपला पाल्य कोणत्या वाहनाने प्रवास करतो याबाबत पालकांनी दक्ष राहावे.मोबाईल नंबर आदी बाबत विविध सूचना पालकांना व शिक्षकांना सभेत दिल्या.
🔹कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री योगेश बावस्कर यांनी केले. तर प्रास्ताविक विद्यालयाचे उपशिक्षक श्री विजय कोळी यांनी केले.
🔸सभेत विद्यार्थ्यांच्या शालेय विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी पोलिसांकडून अधून मधून गस्त व्हावी, शिक्षकांनी विद्यार्थी उपस्थिती बाबत दखल घेऊन तीन वेळा हजेरी घ्यावी.तसेच सभेत मागील वर्षाची शिक्षक पालक पदाधिकारी निवड कायम करण्यात आली.तसेच सर्व शिक्षकांनी आपला परिचय करून दिला.
🔹कार्यक्रमाचे आभार श्रीमती शीतल पाटील यांनी माणलेत. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *