जामनेर (प्रतिनिधी)श्री.ज्ञानगंगा बहुउद्देशीय शिक्षण प्रसारक,मंडळ संचलित ज्ञानगंगा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय,जामनेर येथे दिनांक ०१/०२/२०२५ वार शनिवार रोजी इ.१२ वी च्या विद्यार्थ्यांना निरोप देण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे प्राचार्य आर.जे. सोनवणे, पालक उत्तम सुरवाडे, व शालेय विद्यार्थिनी यांच्या शुभहस्ते शिक्षणाचे आराध्य दैवत सरस्वती मातेचे पूजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेविषयी आदरभाव व जुन्या आठवणींना उजाळा देत आपले मनोगत व्यक्त केले.तर शिक्षक मनोगत विनोद सपकाळ यांनी व्यक्त केले.तसेच अध्यक्षीय भाषणात आर.जे.सोनवणे सर यांनी संस्थेचे अध्यक्ष नामदार गिरीश भाऊ महाजन यांनी गोरगरीब विद्यार्थ्यां करिता शहरातील मध्यवर्ती भागात प्रशस्त इमारत संपूर्ण भौतिक सुविधासह उपलब्ध करून दिलेली आहे.त्यात केजी ते पीजी पर्यंत शिक्षण दिले जाते त्यामुळे विद्यार्थ्यांना निरोप न देता याच ठिकाणी पुढील शिक्षण घेण्याचे आव्हान केले. विविध उदाहरणे देत परीक्षा कालावधीत निर्माण होणारी भिती,ताणतणाव,व स्वतःची सुरक्षा या विषयी मार्गदर्शन केले.व सर्वांना इयत्ता बारावी परीक्षेत यशस्वी होण्याच्या शुभेच्छा दिल्यात. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सपना सुरवाडे व ज्ञानेश्वरी खांजोळे या विद्यार्थिनींनी केले. तसेच सर्व विद्यार्थ्यांना अल्प उपहार देऊन कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व विद्यार्थी व शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी बंधू भगिनी यांनी परिश्रम घेतले.
Leave a Reply