जामनेर(प्रतिनिधी) जिल्हा परिषद उर्दू मुलांची शाळा जामनेर येथे बाल आनंद मेळावा शनिवारी घेण्यात आला. यात विद्यार्थ्यांनी शैक्षणिक ज्ञान बरोबरच व्यवहारिक तसेच बचतीची माहिती व्हावी, यासाठी बाल आनंद मेळाव्याच्या आयोजन केले होते.शनिवारी सकाळी १०:३० वाजता शालेय व्यवस्थापन समितीचे ज्येष्ठ सदस्य श्री साबीर मिस्त्री यांच्या हस्ते या मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले. या मेळाव्यात एकूण ४२ स्टॉल लावण्यात आले होते यावर विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे स्वादिष्ट पदार्थ बनवून आणले होते, या मेळाव्यात शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व सदस्य, शालेय विद्यार्थी, पालकांनी सहभाग घेतला. मान्यवरांसह, पालकांनी विविध प्रकारच्या खाद्य पदार्थांच्या आस्वाद घेतला. यात गुंतवणूक नफा यातूनच केलेली बचत याबाबत शिक्षकांनी मार्गदर्शन केले. व्यवसायातून केलेले बचत बँकेत कशी करावी आणि भांडवल साठी उपयोग कसा करावा याबाबत शकील सर, व साबीर सर, रजियाबाजी, यांनी मार्गदर्शन केले. यावेळी मुख्याध्यापक, सर्व शिक्षक गण, व सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले कार्यक्रम यशस्वी रीतीने पार पडला.
Leave a Reply