जामनेर -(प्रतिनिधी )-जळगाव जिल्हा निवृत्त सेवा संघाच्या जामनेर तालुका अध्यक्षपदी ज्येष्ठ सभासद प्र. भो. चौधरी गुरुजी यांची वार्षिक सर्वसाधारण सभेत बिनविरोध निवड करण्यात आली. माजी अध्यक्ष प.ना.पाटील यांनी आजारपणामुळे राजीनामा दिला असून त्यांच्या जागी ही निवड करण्यात आली आहे.
नाशिक विभाग उपाध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष सदाशिव सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या वार्षिक सभेत 400 सभासदांच्या उपस्थितीत प्र.भो. चौधरी यांच्या अध्यक्षपदाचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. प्र. भो. चौधरी हे एक आदर्श व्यक्तिमत्व असून मनमिळावू,शांत स्वभावाचे व सर्वांना सोबत घेऊन कार्य करून घेणारे व्यक्तिमत्व आहे. ते सेवेत असल्या पासून त्यांना दीर्घकाचा अनुभव आहे. जिल्हा सेवानिवृत्त संघात गेल्या 18 वर्षापासून ते कार्यरत असून सदस्य,गटाध्यक्ष, सरचिटणीस, कार्याध्यक्ष,अशी विविध पदे भूषवून त्यांना हा अध्यक्षपदाचा मान मिळाला आहे. राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री नामदार गिरीश महाजन यांचे अत्यंत निकटवर्तीय म्हणून त्यांची ओळख आहे. संस्थेची सुमारे दोन कोटी रुपयांची स्व मालकीची इमारत असून मोठ्या प्रमाणावर सभासद आहेत त्यांचे या निवडीबद्दल सर्व थरातून आनंद व्यक्त केला जात असून त्यांचे अभिनंदन होत आहे.
Leave a Reply