जिल्हास्तरीय जागतिक ग्राहक हक्क दिनाचा कार्यक्रम जामनेर येथे संपन्न.

जामनेर (प्रतिनिधी)मा जिल्हाधिकारी जळगाव श्री आयुष प्रसाद सर व मा जिल्हा पुरवठा अधिकारी श्री संजय गायकवाड यांचे मार्गदर्शनाखाली जामनेर तालुक्यात जिल्हास्तरीय ग्राहक हक्क दिनाचा कार्यक्रम घेण्यात आला.

दरवर्षी 15 मार्च रोजी जागतिक ग्राहक दिन (World Consumer Rights Day) साजरा केला जातो. या वर्षाचा ही कार्यक्रमाची सुरुत सर्व प्रथम ज्ञानाची देवी सरस्वती व परम पूज्य स्वामी विवेकानंदांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून व दिप प्रज्वलन करून, आदरणीय ग्राहक तिर्थाचे प्रेरणते बिंदु माधव जोशी ( नाना )यांना अभिवादन, नमन करून सदरच्या कार्यक्रमाची सुरुवात झाली या कार्यक्रमा चा मुख्य विषय (थीम ) “सततच्या जीवनशैलीकडे न्याय्य सक्रमण” (Fair Transition to a Sustainable Lifestyle) हा आहे.

या वरील थीम वर ग्राहक पंचायत महाराष्ट्र, जळगांव जिल्हा शाखेचे जिल्हा सचिव श्री डाँ नितीन धांडे यांनी संकल्पनेचा उद्देशबाबत मार्गदर्शन करत ग्राहकाच्या हक्कांचे संरक्षण करणे, टिकाऊ पर्याय स्वीकारण्यासाठी जनजागृती करणे आणि पर्यावरणपूरक जीवनशैलीकडे वळण्यास मदत करणे हा आहे. सध्याच्या युगात ग्राहकांनी पर्यावरणपूरक आणि न्याय्य जीवनशैली स्वीकारणे अत्यंत गरजेचे आहे. त्यासाठी पुढील बाबीवर कार्यक्रमात सांगोपांग चर्चा करण्यात आली आहे.1.शाश्वत उत्पादन आणि उपभोगः पर्यावरणपूरक उत्पादने वापरणे आणि नैसर्गिक साधनसंपत्तीचा योग्य वापर.2.कार्बन फुटप्रिंट कमी करणेः ग्रीन एनर्जी, इको-फ्रेंडली उत्पादन, इलेक्ट्रिक वाहनांचा वापर.3. फिरवून वापरण्यायोग्य आणि पुनर्वापरयोग्य वस्तूंचा स्वीकारः प्लास्टिकच्या ऐवजी बायोडिग्रेडेबल वस्तू वापरणे.4. नैसर्गिक साधनसंपत्तींचा न्याय्य वाटपः गरीब आणि श्रीमंत देशांमध्ये समतोल ठेवणे.5. ग्राहक अधिकार आणि जबाबदाऱ्याः उत्पादने आणि सेवा पर्यावरणपूरक आहेत का, याची माहिती घेणे आणि जबाबदारीने खरेदी करणे.या कार्यक्रमासाठी खालील पदाधिकारी यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले आहे.

जिल्हास्तरीय ग्राहक सरंक्षण परिषद जळगाव अशासकीय सदस्य श्री. नरेंद्र बाळु पाटील,श्री. संजय बाळकृष्ण शुक्ल
श्री. मनोज भांडारकर,सौ सुषमा सुभाष चव्हाण
श्री विनोद भाऊलाल कुमट,श्री गुरुबक्ष जाधवानी
अॅड. भारती राजेश अग्रवाल,श्री. नितीन धांडे,श्री विकास उमराव महाजन,श्री. शिवाजीराव आनंदराव अहिरराव
डॉ. श्री. अशोक फकिरा भालेराव,सौ. अंतिम देवेंद्र पाटणी
श्री. महेश भगवानदास चावला,शिरीन गुलामली अमरेलीवाला
श्री. विजय सदाशिव मोहरीर,तालुका अध्यक्ष डॉ. श्री. उमाकांत पाटील,डॉ.श्री. अनिल नारायण देशमुख,श्री. कैलास शामराव महाजन,श्री. उदयकुमार शरदचंद्र अग्निहोत्री,श्री. महेश पांडूरंग कोठावद,अॅड. श्रीमती मंजुळा कचरुलाल मुंदडा,डॉ.श्री. अविनाश नागिरकर, जिल्हा संघटक श्री. प्रल्हाद सोनवणे, जिल्हा उपाध्यक्ष प्रा.उज्वला देशपांडे यांनी आपले मनोगतातून ग्राहक सरक्षण व हक्क बाबत विवेचन केले. तसेच या कार्यक्रमासाठी शासकीय विभाग प्रमुख म्हणून नानासाहेब आगळे तहसीलदार जामनेर,वैधमापन विभाग उपनियंत्रक श्री बा ग जाधव साहेब,तालुका कृषी अधिकारी कार्यालयाचे विस्तार अधिकारी किशोर पाटील,पुरवठा निरीक्षण अधिकारी नारायण सुर्वे आदींनी ग्राहक फसवणूक प्रतिबंध, वस्तू आणि सेवांवरील जबाबदारी, ग्राहक आयोगांची स्थापना यासारख्या अनुषंगाने मार्गदर्शन केले आहे.तसेच, सरकारने स्वच्छ भारत अभियान, प्लास्टिक बंदी, ऊर्जा कार्यक्षमतेसाठी उपक्रम, डिजिटल पेमेंटचा प्रसार यासारखे प्रयत्न सुरू केले आहेत. पुनर्वापर (Recycling) आणि पुनर्निर्मिती (Upcycling) यावर भर द्यावा.
ऊर्जा वाचवणाऱ्या साधनांचा वापर करावा.
फसवणूक, चुकीच्या जाहिराती आणि ग्राहक हक्कांची पायमल्ली झाल्यास तक्रार नोंदवावी. कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हा प्रमुख गुरुबक्ष जाधवाणी (जळगांव) ग्राहक पंचायत महाराष्ट्र यांनी सांगितले की सततच्या जीवनशैलीकडे न्याय्य संक्रमण हा विषय जागतिक पातळीवर ग्राहकांसाठी महत्त्वाचा ठरत आहे. प्रत्येक ग्राहकाने पर्यावरणपूरक, जबाबदारीने खरेदी आणि योग्य उपभोग पद्धती स्वीकारून आपली भूमिका पार पाडली, तरच एक शाश्वत आणि न्याय्य भविष्य घडवता येईल.जळगांव जिल्हा ग्राहक पंचायत महाराष्ट्र सर्व पदाधिकारी बंधु भगिनी यानी वरीलप्रमाणे सभेसाठी उपस्थिती दिली. जिल्हा पुरवठा अधिकारी जळगाव व तहसील कार्यालय जामनेर यांचे सयुंक्त विद्यमाने घेण्यात आलेला जिल्हास्तरीय ग्राहक दिनाचा कार्यक्रम ग्राहक आणि उपभोक्ते यांना उपयुक्त ठरणार आहे.यावेळी वैधमापन विभाग,गैस एजन्सी,MSEB विभाग व कृषी विभागाचे योजनापर माहितीचे स्टॉल लावण्यात आले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *