जामनेर (प्रतिनिधी)जीनियस इंटरनॅशनल स्कूलमध्ये 26 जानेवारी 2025 रोजी भारतीय प्रजासत्ताक दिन देशभक्तीच्या वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात जीनियस शाळा संस्थेचे उपाध्यक्ष डॉ.श्री. निलेश पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहणाने झाली. यावेळी त्यांनी सपत्नीक भारत माता प्रतिमा पूजन देखील केले. यानंतर राष्ट्रगीत गायन करण्यात आले आणि शाळेचा परिसर ‘भारत माता की जय’ च्या घोषणेने दुमदुमून गेला.
प्रमुख अतिथी म्हणून डॉ. श्री. इम्तियाज खान हे उपस्थित होते तर डॉ. श्री. मुशर्रफ खान व डॉ. श्री. संदीप भागवत यांची विशेष उपस्थिती या प्रसंगी लाभली. भारताच्या संविधानाला सर्वोच्च स्थानी ठेवत भारतीय संविधानाचे प्रस्तावना वाचन यावेळी शाळेच्या शिक्षिका सौ. सविता अधिकार यांनी केले व सर्व उपस्थितांनी यामध्ये सहभाग घेतला. यानंतर मान्यवरांचे यथोचित स्वागत सत्कार करून शाळेच्या प्राचार्या सौ. अरुणा राऊत यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक सादर केले. शाळेतील एका विद्यार्थ्याने प्रजासत्ताक दिनाचे ऐतिहासिक महत्त्व आणि त्यामागील मूल्ये यावर सुंदर भाषण दिले. त्यानंतर विद्यार्थ्यांच्या एका गटाने देशभक्तीपर गीत सादर केले, ज्यामुळे कार्यक्रमाला भावनिक आणि प्रेरणादायी रंग मिळाला. शाळेने यावर्षी घेतलेल्या स्पोर्ट्स इव्हेंट चे बक्षीस वितरण देखील याप्रसंगी करण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी सर्वांना गणतंत्र दिनाच्या शुभेच्छा देत विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे कौतुक व विजेत्या स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या.
संस्थेचे शाळा व्यवस्थापक मा श्री नितीन पाटील यांनी उपस्थित विद्यार्थी व शिक्षकांना संबोधित करताना संविधानाच्या महत्वावर प्रकाश टाकला आणि विद्यार्थ्यांना देशसेवा व समाजसेवेसाठी प्रेरणा दिली. विद्यार्थ्यांना पुढील वेळी नव्या जोमाने प्रयत्न करा यश तुमचेच असेल असा प्रेरणादायी संदेश देखील त्यांनी यावेळी दिला. याप्रसंगी जिनिअस शाळेचे संस्थाध्यक्ष मा.श्री. भीमराव पाटील, संस्थेचे कोषाध्यक्ष मा.श्री. अशोक सोनवणे, संस्थेचे संस्थाचालक मा.डॉ.श्री. नंदलाल पाटील, मा.श्री. उदय पाटील, मा.सौ. शिल्पा पाटील यांनी उपस्थित राहून शिक्षक व विद्यार्थ्यांचा उत्साह वाढविला. मा.सौ. मनीषा पाटील, मा.सौ. जयश्री पाटील, मा.सौ. रूपाली पाटील, मा.डॉ.सौ. माधुरी पाटील, डॉ.श्री. प्रताप पाटील यांची उपस्थिती उत्साहवर्धक होती. एकूणच संपूर्ण कार्यक्रमातून देशप्रेमाचा उत्साह व्यक्त केला गेला. संपूर्ण कार्यक्रम अतिशय प्रेरणादायी आणि विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय एकतेचा संदेश घेऊन येणारा ठरला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेच्या विद्यार्थिनी सिद्धी अहिरे, साक्षी राठोड, दीक्षिका राठोड, श्रुती पवार व स्नेहल पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन साहिल चौधरी याने मानले.
वंदे मातरम ने कार्यक्रमाची सांगता झाली.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजन, नियोजन व यशस्वीतेसाठी सर्व संस्थाचालक, प्राचार्य, इन्चार्ज, सर्व विभागांचे प्रमुख, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, व विद्यार्थी यांनी प्रयत्न केले.
Leave a Reply