जामनेर- (प्रल्हाद सोनवणे )-येथील शेतकरी सहकारी संघातर्फे शासनाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या सोयाबीन खरेदी केंद्राचे उद्घाटन कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अशोक भोईटे व शेतकरी सहकारी संघाचे चेअरमन चंद्रकांत बाविस्कर यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी माहिती देताना शेतकरी सहकारी संघाचे चेअरमन चंद्रकांत बाविस्कर म्हणाले की सोयाबीन खरेदी केंद्राला शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत असून 87 शेतकऱ्यांनी आतापर्यंत नोंदणी केली आहे. शासनातर्फे 4292 रुपये हमीभाव दिला जाणार आहे. ज्वारी खरेदी केंद्रालाही लवकरच सुरुवात होणार असून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी करावी असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. याप्रसंगी संचालक डॉक्टर सुरेश मन्साराम पाटील, रंगनाथ पाटील, आबाजी पाटील, नाना पाटील, भिकारी जाधव, संजय पाटील, बाबुराव गवळी, दगडू चौधरी, शेतकरी सहकारी संघाचे सचिव गोपाल पाटील, संदीप शिंदे ,अतुल पाटील, योगेश पाटील, कृऊबा सचिव प्रसाद पाटील आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते
जामनेर शेतकरी संघातर्फे सोयाबीन खरेदी केंद्राचे उद्घाटन

Leave a Reply