जामनेर (प्रतिनिधी) जामनेर विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 च्या अनुषंगाने 19-जामनेर विधानसभा मतदार संघामध्ये दि.20/11/2024 रोजी मतदानाची प्रक्रिया पडलेली आहे. विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 ची मतमोजणी दि.23 नोव्हेंबर,2024 रोजी (शनिवार) सकाळी 8.00 वाजता शासकीय धान्य गोदाम क्र. 2 उत्तरेकडील खोली,जळगाव रोड,जामनेर मध्ये होणार आहे. 19-जामनेर विधानसभा मतदार संघासाठी EVM मतदान यंत्राचे मोजणीकामी 14 टेबल, सेना दलातील मतदारांसाठी 1 टेबल व टपाली मतपत्रिकाकरीता एकुण 7 टेबल असे एकुण एकंदर 22 टेबल निश्चित करण्यात आलेले आहे.सदर मतमोजणीकामी 3 स्तरीय पोलीस सुरक्षा यंत्रणा कार्यान्वीत करण्यात आलेली आहे.
तसेच प्रत्येक टेबलकरीता 1 मतमोजणी प्रतिनिधी याप्रमाणे एकूण 22 व निवडणूक निर्णय अधिकारी यांचे टेबलकरीता 1 (केवळ उमेदवार अथवा निवडणूक प्रतिनिधी उपस्थित नसल्यासच) असे एकुण 23 प्रतिनिधी उमेदवारांस नेमता येतील. याबाबत या कार्यालयाचे क्र.निवडणूक/कावि/306/2024 दि.16/11/2024 रोजी सर्व उमेदवारांना लेखी कळविण्यात आलेले आहे. प्रत्येक मतमोजणी टेबल करीता 1 मतमोजणी पर्यवेक्षक, मतमोजणी सहायक, 1 सुक्ष्म निरीक्षक तसेच टपाील मतमोजणी कामी टेबलनिहाय अतिरिक्त सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. EVM मतमोजणी एकूण 14 टेबलवर घेण्यात येणार असून एकुण 25 फेरी मध्ये मतमोजणी पूर्ण करण्यात येणार आहे.वैध ओळखपत्र असणा-या मतमोजणी प्रतिनिधी यांनाच मतमोजणी हॉलमध्ये प्रवेश दिला जाईल,याची नोंद घ्यावी.
तरी उपरोक्त नमुद केलेप्रमाणे दि.23 नोव्हेंबर,2024 रोजी (शनिवार) सकाळी 8.00 वाजेपासून आपण स्वत: व आपले प्रतिनिधी यांनी ओळखपत्रासह मतमोजणीसाठी शासकीय धान्य गोदाम क्र. 2 उत्तरेकडील खोली,जळगाव रोड,जामनेर येथे उपस्थित राहण्याचे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या वतीने करण्यात आले आहे.
जामनेर विधानसभा मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज.

Leave a Reply