जामनेर (प्रतिनिधी)जामनेर येथील सोनबर्डी टेकडी येथे जामनेर नगरपरिषदेमार्फत मा. ना. श्री. गिरीषभाऊ महाजन,मंत्री, जलसंपदा, महाराष्ट्र राज्य यांचे संकल्पनेतून व मा.सौ. साधनाताई महाजन, माजी नगराध्यक्षा यांचे मार्गदर्शनातून प्रादेशिक पर्यटन योजने अंतर्गत विविध कामे पुर्ण झालेली आहेत, तसेच बरीच कामे सुरु आहेत.सदर ठिकाणचे सोनेश्वर महादेव मंदीर, जॉगींग ट्रॅक, सायकल ट्रॅक, नानानानी पार्क, लेझरशो, आर्टीफिशियल बिच, चौपाटी हे पर्यटकांचे आकर्षण केंद्र झालेले असून सदर ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पर्यटक येतात.
सदर ठिकाणी आज जामनेर नगरपरिषदेमार्फत नितीन बागुल, मुख्याधिकारी नगरपरिषद जामनेर यांचे मार्गदर्शना खाली महास्वच्छता अभियान राबविण्यात आले. स्वच्छता अभियानातंर्गत सोनबर्डी टेकडी येथे डिपक्लीन मोहीम राबविण्यात आली. सदरचे मोहीमेतंर्गत 4 ते 5 टन कचरा जमा करण्यात आला. त्यामध्ये प्लॉस्टीक, पाण्याच्या रिकाम्या बाटल्या, खाद्यपदार्थचे रिकामे पाकीट इत्यादी जमा करण्यात आले.
जामनेर नगरपरिषदेमार्फत नागरीकांना आवाहन करण्यात येते की, सदरचा परिसर हा स्वच्छ ठेवावा, आपण उघड्यावर कचरा फेकु नये, सदर ठिकाणी असलेल्या कचरा कुंडीतच कचरा टाकावा जेणे करून सदरचा परिसर स्वच्छ व सुंदर ठेण्यास मदत होईल.
सदरची मोहीम यशस्वी करणेसाठी श्री. रविकांत डांगे, उपमुख्याधिकारी, प्रदिप धनके नगर अभियंता, अमर राऊत नगर अभियंता, आर .डी. सुर्यवंशी पा.पु. अभियंता, दत्तात्रय जाधव लेखापाल, गौरव कडू अंतर्गत लेखापरीक्षक, आनंद कळमकर नगर रचना सहाय्यक, श्रीमती सलोनी वाघ बांधकाम अभियंता, श्रीमती पल्लवी शेळके करनिर्धारण व प्रशासकीय अधिकारी, देविदास अहिरे कर अधिक्षक, विशाल दिक्षीत करनिर्धारण व प्रशासकीय अधिकारी, विजय सपकाळे स्वच्छता निरीक्षक, गजानन माळी आरोग्य सहाय्यक, दादोजी बाविस्कर पाणी पुरवठा विभाग प्रमुख , श्रीकांत भोसले, आस्थापना लिपीक, भरत मराठे, आत्माराम शिवदे, अरुण जाधव, शेख बिलाल, गजानन गाडगे, गोकुळ मराठे, संदिप काळे तथा सर्व अधिकारी कर्मचारी व सर्व सफाई कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
जामनेर नगरपरिषदेमार्फत सोनबर्डी टेकडी येथे राबविण्यात आले महास्वच्छता अभियान.

Leave a Reply