जामनेर (प्रतिनिधी)महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे,जळगाव जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद जळगाव , पंचायत समिती शालेय शिक्षण क्रीडा विभाग जामनेर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जामनेर तालुकास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा पारितोषिक वितरण समारंभ २०२४-२५ चे आयोजन पंचायत समिती कार्यालय,
जामनेर येथे करण्यात आले होते या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे जळगाव जिल्हा क्रीडा अधिकारी श्री रवींद्र नाईक साहेब यांच्या हस्ते *जामनेर तालुकास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत उत्कृष्ट प्रशिक्षक पंच म्हणून कार्य केल्याबद्दल जामनेरपुरा येथील इंदिराबाई ललवाणी कनिष्ठ महाविद्यालय क्रीडा शिक्षक प्रा.समीर विष्णू घोडेस्वार* यांचा सत्कार गुलाबपुष्प, शासकीय प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी तालुका क्रीडा अधिकारी जगदीश चौधरी, क्रीडा अधिकारी सचिन निकम, शालेय पोषण आहार अधीक्षक तथा विस्तार अधिकारी व्ही व्ही काळे, जामनेर तालुका क्रीडा संयोजक डॉ.आसिफ खान आदी.मान्यवर उपस्थित होते.
Leave a Reply