कोल्हापूर(प्रतिनिधी)रथसप्तमीला आपल्या भारतीय संस्कृतीत खूप महत्त्व आहे. सूर्य नारायण हे दक्षिणेकडून उत्तरेकडे प्रयास करतात. म्हणून सूर्यनारायण हे आखील विश्वातील आद्य प्रवासी मानले जातात. ज्याच्या प्रवासामुळेच ऋतूचक्र आखंडितपणे सुरू असते. म्हणून भारतीय संस्कृतीत रथसप्तमीला प्रवासीदिन म्हणून अनन्यसाधारण महत्त्व आहे. असे मनोगत ग्राहक पंचायत महाराष्ट्र कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष मा.बी.जे.पाटील यांनी व्यक्त केले…
कार्यक्रमाचे अध्यक्ष कोल्हापूर बस स्थानकाचे विभागीय नियंत्रक मा.शिवराज जाधव साहेब हे होते.अध्यक्षीय भाषणात कोल्हापूर विभागा मार्फत प्रवाशांना जास्ती जास्त सोयीसुविधा उपलब्ध करून प्रवशांना सुखकर प्रवास कसा होईल हा आमचा प्रयत्न राहील. आगारात स्वच्छता ठेवली जाते. तसेच सि.सि.टिव्हीमुळे चोर्यांचे प्रमाण कमी झाले आहे. तरी देखील ग्राहक पंचायतच्या माध्यमातून प्रवाशांच्या समस्या बाबत ज्या ज्या सुचना केल्या आहेत त्या त्या सोडवण्याचा प्रयत्न केला आहे व केला जाईल. यावेळेस 20/25 वर्ष विना अपघात सेवा पुरवणारे वाहक चालक यांचा गुलाब पुष्प देऊन गौरविण्यात आले. तसेच प्रवाशांनाही गुलाब पुष्प व तिळगूळ वाटप करणेत आले… यावेळेस ग्राहक पंचायत महाराष्ट्र कोल्हापूर जिल्हा कार्याध्यक्ष श्री.संजय पोवार, जिल्हा सचिव श्री.दादासो शेलार, जिल्हा सदस्य श्री.शिवगोंडा पाटील, जिल्हा सदस्य व रिटायर्ड पोलीस निरीक्षक ई.जी.खोत, कोल्हापूर आगारचे मेहत्तर साहेब तसेच वाहक चालक व कर्मचारी व प्रवासी उपस्थित होते..
Leave a Reply