केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांच्या प्रयत्नाने जळगांव जिल्ह्यांतर्गत सीसीआयचे 11 कापूस खरेदी केंद्र सुरु…

जामनेर (प्रतिनिधी)जळगांव जिल्ह्यातील विविध ठिकाणी भारतीय कापूस महामंडळ (सीसीआय) चे कापूस खरेदी केंद्र सुरु करणे बाबत केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांनी केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री श्री.गिरीराज सिंग यांना विनंती केली होती. त्यानुसार भारतीय कापूस महामंडळ मार्फत शेंदुर्णी, जामनेर, बोदवड, भुसावळ, चोपडा, पाचोरा, चाळीसगाव, जळगांव, धरणगांव, एरंडोल व पारोळा अशा एकूण ११ ठिकाणी भारतीय कापूस महामंडळ (सीसीआय) चे कापूस खरेदी केंद्र सुरु करण्यात आले आहे.

भारतीय कापूस महामंडळ (सीसीआय)मार्फत एफएक्यू प्रतीच्या कापसाची किमान हमी दराने खरेदी सुरु असून, कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या मागणीनुसार जळगांव जिल्ह्यांतर्गत प्रत्येक तालुक्यावर कापूस खरेदी केंद्र सुरु करणे बाबत केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांनी 

केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालय यांना मागणी केली होती. परंतु काही त्रांत्रिक अडचणी मुळे काही तालुक्यावर सुरु करता येणार नाही, तर मुक्ताईनगर येथे लवकरच खरेदी केंद्र सुरु करणार असल्याबाबत केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालय कडून कळविण्यात आले आहे. सदर ११ केंद्रावर संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *