*करू या स्वागत*
*२०२५ नववर्षाचे*….
प्रसन्न चेहऱ्याने
निर्मळ मनाने
करू या स्वागत
२०२५ नववर्षाचे…..
नव्या संकल्पांनी
नव्या विचारांनी
करू या स्वागत
२०२५ नववर्षाचे…..
ठेवू मनी ध्यास
प्रगतीचा विकास
करू या स्वागत
२०२५ नववर्षाचे…..
करू या प्रार्थना देवाला
नको नैसर्गिक संकटे
नको काही भांडणतंटे
करू या स्वागत
२०२५ नववर्षाचे……
सर्व दूर राहू दे शांतता
राहू दे समता, बंधूता
करू या स्वागत
२०२५ नववर्षाचे…….
नको कोणताच दूरावा
सर्वांना नांदू दे एकोप्याने
करू या स्वागत
२०२५ नववर्षाचे…….
सर्वांना नवीन वर्ष हे
सुखसमृद्धीने जावू दे
*करू या स्वागत*
*२०२५ नववर्षाचे*……
——————————————————–
✍🏻 *रचना*:- पी.टी.पाटील (शांतीसुत)
रा. कुऱ्हे पानाचे ता भुसावळ
हल्ली मुक्काम जामनेर
संपर्क :-९४२१९१४१२३
——————————————————-
Leave a Reply