करमाड पळासखेडा शिवरस्ता महसूल, भूमी अभिलेख, व पोलीस विभागाचे सयुंक्त कारवाईने शेतकऱ्यांसाठी खुला

Oplus_131072

जामनेर (प्रतिनिधी) जामनेर तालुक्यातील करमाड पळासखेडा शिवरस्ता एकूण अंतर अंदाजे ३ किमी पैकी अतिक्रमीत अंतर ०.५ किमी वरील शिव रस्ता अतिक्रमण खुले करण्यासाठी ग्रामस्तरीय अधिकारी यांनी वारंवार भेटी देऊन संबंधित शेतकरी यांना याबाबत सामंज्यस्याने रस्ता खुला करून देणेबाबत विनंती करूनही मोजणी झाल्याशिवाय रस्ता खुला करू नये अशी भूमिका लगतच्या दोन शेतकरी बांधवानी घेतली.स्थळ निरीक्षण अंती सामंजस्य व दोन शेतकरी यांचा विरोध कायम असल्याने दिनांक १८.०४.२०२५ रोजी उप अधीक्षक भूमी अभिलेख जामनेर यांचे प्रतिनिधी मार्फत पोलीस बंदोबस्तामध्ये मोजणी करून सदरचा शिवरस्ता शेतकरी बांधवांकरिता खुला करण्यात आला आहे.

सदरचा अतिक्रमीत शिवरस्ता खुला झाल्याने परिसरातील एकूण अंदाजे ७० ते ९० शेतकरी यांना सदर रस्त्याचा फायदा हा शेतमाल वाहतूक करणे कामी होणार आहे.

मा जिल्हाधिकारी जळगाव आयुष प्रसाद , मा उपविभागीय अधिकारी विनय गोसावी यांचे मार्गदर्शनाखाली सदर रस्ता खुला करण्याची कार्यवाही तहसीलदार जामनेर नानासाहेब आगळे यावेळी ग्राम महसूल अधिकारी करमाड नितीन ब्याळे , ग्राम महसूल अधिकारी रवींद्र घुले ,ग्रामपंचायत अधिकारी, भूमी अभिलेख कर्मचारी,सरपंच,पोलीस पाटील, पोलीस कर्मचारी व शेतकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

सदरच्या कारवाई मुळे शेतकरी बांधवाकडून समाधान व्यक्त केले जात असून जामनेर तालुक्यातील शिव पानंद रस्ते मोकळे करण्यासाठी प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन या निमित्ताने शेतकरी बांधवाना करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *