जामनेर (प्रतिनिधी)आज श्री ज्ञानगंगा बहुउद्देशीय शिक्षण प्रसारक,मंडळ संचलित एकलव्य प्राथमिक व ज्ञानगंगा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय,जामनेर येथे आज विद्यालयाच्या सचिव जामनेर नगरीच्या मा.लोक नियुक्त नगराध्यक्षा सौ.साधनाताई महाजन यांच्या हस्ते आषाढी एकादशीला वारकरी दिंडीचे पालखी पूजन करण्यात आले. त्यावेळी मंडळाचे संचालक व ज्येष्ठ मार्गदर्शक एडवोकेट श्री शिवाजी सोनार, विद्यालयाचे प्राचार्य,श्री.राजेंद्र सोनवणे, श्री.देविदास काळे, श्री किशोर पाटील उपस्थित होते.
यावेळी विद्यालयाच्या प्रांगणातून दिंडी शिवाजीनगर,बस स्टॅन्ड मार्गे नगरपालिका चौक बजरंगपुरा अशी काढण्यात आली. त्यावेळी विद्यार्थी विठ्ठल रुखुमाई व वारकऱ्यांच्या वेशभूषेत आले होते. विद्यार्थी व शिक्षक यांनी दिंडी सोहळ्यात पावली घेत फुगड्यांचा आनंद घेतला. *विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल* जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमला शाळेतील विद्यार्थ्यांनी टाळ, मृदंग,हातात भगवे झेंडे घेऊन विठू नामाचा गजर केला. शेवटी नामदार श्री गिरीश भाऊ महाजन यांच्या निवासस्थानी प्रांगणात दिंडी सोहळ्यात सहभागी सर्व विद्यार्थी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यासह भाविक भक्तांना साबुदाणा खिचडीचे वाटप व राजू शर्मा यांच्याकडून राजगिरा लाडू वाटप करण्यात आले.दिंडी सोहळ्यात सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.
Leave a Reply