इंदिराबाई ललवाणी विद्यालयाची कु.गौरी राठोड व कु.कोमल शिंदे यांची अमरावती येथे होणाऱ्या राज्यस्तरीय क्रॉस कंट्री स्पर्धेसाठी निवड:

जामनेर(प्रतिनिधी)जामनेर: महाराष्ट्र राज्य ॲथलेटिक्स असोसिएशन संलग्नित जळगाव जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशन द्वारा आयोजित राज्य क्रॉस कंट्री स्पर्धेसाठी जिल्हा संघ निवड चाचणी व अजिंक्यपद स्पर्धा आज दुपारी ३ वा. मोहाडी फाटा जळगाव येथे संपन्न झाल्या.
या स्पर्धेत इंदिराबाई ललवाणी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाची खेळाडू १६ वर्षाआतील मुलींच्या गटात कु.गौरी देवसिंग राठोड ( इ.११ विज्ञान क ) प्रथम क्रमांक तर कु.कोमल राजू शिंदे ( इ.११ वी विज्ञान क ) द्वितीय क्रमांक स्थान प्राप्त करून या दोघांची दि. ५ जानेवारी २०२५ येथे अमरावती येथे होणाऱ्या राज्य राज्यस्तरीय क्रॉस कंट्री स्पर्धेसाठी निवड झाली आहे. स्पर्धेप्रसंगी त्यांचा सत्कार महाराष्ट्र राज्य ॲथलेटिक्स असोसिएशनचे संचालक तथा जळगांव जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनचे सचिव राजेश जाधव,उपाध्यक्ष प्रा.इकबाल मिर्झा,कार्याध्यक्ष डॉ.विजय पाटील,निवड समिती प्रमुख जी सी पाटील,जिल्हा ॲथलेटिक्स राज्य पंच योगेश सोनवणे, प्रा.समीर घोडेस्वार यांच्या हस्ते शुभेच्छा तथा सत्कार करण्यात आला.
तर इंदिराबाई ललवाणी शैक्षणिक संकुलाचे अध्यक्ष राजेंद्र भाऊ महाजन, सचिव किशोर भाऊ महाजन, मुख्याध्यापक एस.आर.चव्हाण, उपमुख्याध्यापक एस.एन.चवरे, उपप्राचार्य प्रा.के.एन.मराठे, पर्यवेक्षक प्रा.के.डी.निमगडे, पर्यवेक्षक प्रा.जी.जी.अत्तरदे, पर्यवेक्षक प्रा. डी झेड गायकवाड, ज्येष्ठ क्रीडा शिक्षक बी पी बेनाडे, गजानन कचरे यांनी अभिनंदन केले तर सर्व शिक्षक बंधू-भगिनी तथा शिक्षकेतर कर्मचारी यांनी कौतुक केले.
वरील खेळाडूंना क्रीडा विभाग प्रमुख जी.सी.पाटील तर उच्च माध्यमिक विभागाचे क्रीडा शिक्षक प्रा.समीर घोडेस्वार यांचे मार्गदर्शन लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *