आदिवासी आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांचा इस्रो दौरा; जिल्हाधिकाऱ्यांकडून शुभेच्छा.


जळगाव -(जितेंद्र सोनवणे) एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, यावल अंतर्गत जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनातून निवड झालेल्या विद्यार्थ्यांना इस्रो (अहमदाबाद) सहलीसाठी संधी मिळाली आहे. विद्यार्थ्यांसाठी गौरवाचा क्षण! जिल्हाधिकारी श्री आयुष प्रसाद यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देऊन त्यांच्या सहलीतील अनुभव लेखी स्वरूपात कळवण्याची विनंती केली. जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात प्रत्येक वयोगटातील प्रथम तीन क्रमांक प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. एकूण 18 विद्यार्थी आणि 6 शिक्षक-कर्मचारी या शैक्षणिक सहलीसाठी रवाना झाले आहेत.विशेष आकर्षण – रेल्वे आणि विमान प्रवासाचा अनुभव!विद्यार्थ्यांचा प्रवास रेल्वेने होणार असून, परतीचा प्रवास विमानाने करण्याची संधी त्यांना मिळणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये विशेष उत्साहाचे वातावरण आहे.

इस्रो व विज्ञान केंद्र भेट – भविष्यातील वैज्ञानिकांची पायाभरणी! अहमदाबाद येथील विक्रम साराभाई स्पेस रिसर्च सेंटरला भेट सायन्स सिटीतील एक्वेरियम, रोबोटिक्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि इतर वैज्ञानिक विभागांचा प्रत्यक्ष अनुभव विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी!

“विद्यार्थ्यांची वैज्ञानिक जिज्ञासा वाढवणे आणि त्यांना भविष्याची दिशा देणे हाच या उपक्रमाचा उद्देश आहे. अशा शैक्षणिक सहलींमुळे केवळ पुस्तकातील ज्ञान नव्हे, तर प्रत्यक्ष अनुभव मिळतो. भविष्यात देखील अशा उपक्रमांना चालना दिली जाईल,” असा विश्वास प्रकल्प अधिकारी अरुण पवार यांनी व्यक्त केला.

सहलीच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष योगदान –
शिक्षण विभागाचे सहायक प्रकल्प अधिकारी पवन पाटील, आर. एम. लावणे, संदीप पाटील, विश्वास गायकवाड आणि एल. एम. पाटील यांनी सहलीचे उत्कृष्ट नियोजन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *