अहील्याबाईंनी सर्व समाजासाठी कार्य केले ! एडवोकेट सुचिताजी हाडा.


जामनेर प्रतिनिधी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांनी प्रजाजनांच्या हिताचे अनेक निर्णय घेतले ,त्याची आपल्या राजवटीत काटेकोरपणे अंमलबजावणी केली ,शिवाय धार्मीकतेला जपुन बारा ज्योतीर्लींगांसह अनेक मंदिरांचा जीर्णोद्धार राजस्वातील पैशातुन नाही तर स्वतःच्या पैशाने केला ,

अशा शिक्षीत आणी संस्कारीत राजमाता अहील्याबाईंनी अशी अनेक प्रकारचे कार्यसर्व समाजासाठी केले असून त्यांचा अहिल्याबाईंचे जीवन परिचयाची उजळणी एडवोकेट सुचिताताई हाडा यांनी शहरातील एकलव्य माध्यमिक शाळा येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलत होत्या,

अहील्याबाई होळकरांच्या त्रिशताब्दी जन्मोत्सव सोहळ्याच्या निमीत्ताने प्रेरणावंत बुद्धिजीवी प्रेरणा संवाद भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा (पूर्व) जामनेर येथे कार्यक्रम व्यासपीठावर जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बावीस्कर,जेष्ठ नेते एडवोकेट शिवाजी सोनार,संजय गरुड, गोविंद अग्रवाल, अजय भोळे,नवलसिंग पाटील, आतिश झाल्टे,अनंत कुलकर्णी,हरलाल कोळी, प्रदीप लोढा,रवींद्र झाल्टे ,मयुर पाटील, कमलाकर पाटील,प्रा शरद पाटील ,डॉ प्रशांत भोंडे,

डॉ.संजीव पाटील,अमीत देशमुख , राजधर पांढरे, अमोल देशमुख, योगेश मोते, दीपक पाटील, सुहास पाटील, कैलास पालवे, सुभाष पवार, हरीश पर्वते,प्रमोद सोनवणे, आदी सह डॉक्टर्स,प्राध्यापक, इंजिनियर्स, प्रमुख पदाधीकारी नागरिक उपस्थित होते .यावेळी जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, नवलसिंग पाटील, गोविंद अग्रवाल,आदींनी आपले विचार मांडले , कार्यक्रम तर रवींद्र झाल्टे यांनी सुत्रसंचलन व मयूर पाटील यांनी आभार मानले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *