जामनेर(प्रतिनिधी)खेळ हा विद्यार्थी जीवनातील एक महत्त्वाचा व अविभाज्य भाग आहे. ‘आरोग्यम् धनसंपदा’ या म्हणीचे महत्त्व आपल्या सर्वांना माहित आहे. निरोगी शरीरासाठी आपल्याला व्यायाम केले पाहिजे व खेळलेही पाहिजे. खेळांमुळे शिस्त, परिश्रम, संघभावना, नेतृत्व यांसारखे गुण वाढीस लागतात. सर्वच शाळा व महाविद्यालयांमध्ये -वार्षिक क्रिडादिवसाचे आयोजन केले जाते. लॉर्ड गणेशा या शाळेत दरवर्षी क्रिडादिवस साजरा होतो. क्रीडा दिवसाच्या उदघाट्नाला नामवंत खेळाडू मुख्य पाहुणे म्हणून”श्रीमती नेहा सदाशिव देशमुख – सॉफ्टबॉल खेळाडू”
या महाराष्ट्रातील एक अतिशय कुशल सॉफ्टबॉल खेळाडू आहेत. त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे त्यांची 2022-23 साठीच्या श्री छत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी निवड झाली आहे. हा सन्मान त्यांच्या क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची पोचपावती आहे.
तसेच, त्यांनी 2024 मध्ये चायनीज तैपेई, तैवान येथे आयोजित चौथ्या एशियन युनिव्हर्सिटी महिला सॉफ्टबॉल आशिया कपसाठी भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. त्यांच्या खेळातील कौशल्य, मेहनत, आणि समर्पण यामुळे त्यांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.त्यांच्या यशस्वी वाटचालीसाठी त्यांना संस्थेच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या तसेच यांचे सोबत शूटिंग हॉली बॉल महारास्ट्र राज्य सचिव सुनील (बंडू )रामदास पाटिल जामनेर हेही प्रमुख पाहुणे उपस्थित होते. सुरवातीला माता सरस्वती व हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्वलन करण्यात आले या प्रसंगी नामवंत खेळाडू श्रीमती नेहा सदाशिव देशमुख – सॉफ्टबॉल खेळाडू”यांनी विदयार्थ्यांना मार्गदर्शन करीत आपले मनोगत व्यक्त केले.या वेळी संस्थेचे अध्यक्ष हेमंत ललवानी ,अभय बोहरा,दीपक पाटिल धर्मेंद्र भूरट,पिंटू कोठारी,विनोद बुले,अभय सांखला,सिंग सर,मोरे सर,पालवे सर आणि शिक्षक, कर्मचारी, विदयार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले विदयार्थ्यांनी विविध खेळांचे प्रात्यक्षिक सादर केले शेवटी
Leave a Reply