जामनेर(प्रतिनिधी)महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे व जळगाव जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जामनेर नगर पंचायत समिती शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, जामनेर तालुका शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने शाळास्तरावर विद्यार्थ्यांसाठी दि.४ फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय युवा दिन (रथसप्तमी) निमित्त सूर्यनमस्कार दिन साजरा करण्यात येणार आहे.या निमीत्ताने विविध शाळेतील क्रीडा
शिक्षकांसाठी सूर्यनमस्कार दिन शिबिराचे आयोजन आज सकाळी ८:३० ते ९:३० वाजे.यादरम्यान इंदिराबाई ललवाणी विद्यालयाच्या पटांगणावर करण्यात आले.या प्रशिक्षण शिबिरात सूर्यनमस्कार, प्रास्ताविक हालचाली, ताडासन, वीरासन, वृक्षासन, कपालभाती, भस्रिका प्राणायाम आदी. विविध योगासने पतंजली योग समितीचे योगप्रशिक्षक राजेंद्र महाले, मंगलसिंग पाटील यांनी तर ध्यान, हास्ययोग, अनुलोम- विलोम क्रिया,
सूर्यनमस्काराचे प्रात्यक्षिक इंदिराबाई ललवाणी माध्य. व उच्च माध्यमिक विद्यालयाचे क्रीडा शिक्षक तथा योग प्रशिक्षक प्रा.समीर घोडेस्वार यांनी दिले या प्रशिक्षण शिबिरात तालुक्यातील १५२ क्रीडा शिक्षकांनी योग अभ्यासाचे धडे घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तथा प्रास्ताविक जामनेर तालुका क्रीडा संयोजक डॉ.आसिफ खान यांनी केले.
जळगाव जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक, तालुका गटशिक्षणाधिकारी श्रीकृष्ण लोहार, यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले तर मुख्याध्यापक एस आर चव्हाण, उपप्राचार्य प्रा.के एन मराठे, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक पी ओ पाटील, क्रीडा विभाग प्रमुख जी सी पाटील यांचे सहकार्य लाभले.
Leave a Reply