सुसंस्कृत पिढी निर्माण होणे ही काळाची गरज- नामदार गिरीश महाजन. इंदिराबाई ललवाणी शाळेत विद्यार्थ्यांना निरोप समारंभ

जामनेर -(प्रल्हाद सोनवणे )-जामनेर शहर ही शिक्षणाचे पंढरी म्हणून ओळखली जाते. येथे शिक्षणाला दिशा मिळाली गती मिळाली म्हणून जामनेर ते आज नावलौकिक आहे शिक्षणामुळे सुशिक्षित पिढी निर्माण झाली त्याचबरोबर सुसंस्कृत पिढी निर्माण होणे ही काळाची गरज आहे असे प्रतिपादन राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री नामदार गिरीश महाजन यांनी व्यक्त केले जामनेर येथील इंदिराबाई ललवाणे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या इयत्ता दहावी व बारावी च्या विद्यार्थ्यांना निरोप समारंभ कार्यक्रमात नामदार महाजन बोलत होते.


व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार व संस्थेचे संचालक मनीष दादा जैन संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र महाजन सचिव किशोर महाजन भाजपा नेते जे. के. चव्हाण साहेब तालुकाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर संचालक श्रीराम महाजन माजी मुख्याध्यापक तसेच संचालक किशोर महाजन आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी नामदार महाजन यांचे मंत्रीपदी निवड झाल्याने संस्थेच्या वतीने अध्यक्ष राजेंद्र महाजन सचिव किशोर महाजन यांनी शाल श्रीपा मानचिन्ह देऊन त्यांचा सत्कार केला. मुख्याध्यापक सुनील चव्हाण, ज्युनिअर कॉलेजचे उपप्राचार्य किरण मराठे यांनी आलेल्या मान्यवरांचा सत्कार केला.


नामदार महाजन पुढे म्हणाले की, आई- वडील उपाशी राहून मुलांना मोठे करतात. उच्च शिक्षण देतात. मात्र हीच मुले शिक्षित झाल्यावर आई-वडिलांना वागवत नाही .त्यांना वृद्धाश्रमात नेऊन ठेवतात. हा कुठला सुसंस्कृतपणा? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. मुले- मुली मोठे झाल्यावर पळून जातात आजची पिढी व्यसनाधीन होत चालली आहे. दारू गुटखा च्या आधीन जाऊन तरुण बरबाद होत आहे. किती मेहनत घेऊन आई-वडिल मुलांसाठी काबाड कष्ट करून त्यांना मोठी करतात मात्र हीच मुले मोठी झाल्यावर त्यांना दुःख देतात. मुलांनी मोबाईल व टीव्हीपासून दूर राहिले पाहिजे. खूप शिका मेहनत परिश्रम व आत्मविश्वास निर्माण करा. तुम्ही जीवनात कधीच मागे राहू शकणार नाही. इच्छाशक्ती प्रबळ असली पाहिजे. मनी जिद्द असली पाहिजे. हे स्पर्धेचे युग आहे तुम्हाला अजून खूप काही करायचे आहे. आदर्श नागरिक म्हणून पुढे या. असा मौलिक सल्लाही नामदार महाजन यांनी विद्यार्थ्यांना दिला. माजी आमदार मनीष दादा जैन यांनी आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांना पुढील उच्च शिक्षणासाठी मुंबई पुणे जाण्याची गरज भासणार नाही अशी शिक्षण पद्धती जामनेरला नामदार महाजन यांनी उपलब्ध करून द्याव्यात अशी अपेक्षा व्यक्त केली.आपल्या प्रास्ताविकात संस्थेचे सचिव किशोर महाजन म्हणाले की ग्रामीण विकास तरुण मित्र मंडळ ही संस्था ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांचे प्रतिनिधित्व करणारी संस्था असून या शिक्षण सहगोलात सकुलात 8000 विद्यार्थी शिक्षण घेत असून चारशे शिक्षक त्यांच्यावर संस्कार घडविता आहे विद्यार्थ्यांनी शाळेचा व गुरुजनांचा विसर पडू देता कामा नये भविष्यात पुढे मोठ्या पदावर गेल्यावर व्यसनाधीन व प्रलोभनाला बळी पडू नका असे मार्गदर्शन त्यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ वैशाली वंजारी मॅडम व सौ निकिता पाटील यांनी केले तर आभार सौ.माधुरी महाजन मॅडम यांनी मांडले निमगडे सर यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *