बीएचएमएस सीसीएमपी डॉक्टरांचे रजिस्ट्रेशन एमएमसी त कायम ठेवण्यासाठी मंत्री ना महाजनांना निवेदन

जामनेर(प्रतिनिधी)होमिओपॅथिक डॉक्टरांना दुर्गम भागात इमर्जन्सीला ऍलोपॅथिक औषधी वापरता यावी यासाठी सीसीएमपी एक वर्षीय कोर्स शासकीय एमबीबीएस महाविद्यालयात देण्यासाठी शासन नियम क्र. एम एच सी २०१४ / प्र. क्र. ३०८/१४ शिक्षण २ दि. १३ ऑगस्ट २०१४ अन्वये मान्यता देण्यात आली होती. सीसीएमपी उत्तीर्ण डॉक्टरांची रजिस्ट्रेशन महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल (एमएमसी) करण्यात यावे असा कायदा राज्यपालांच्या सहिनिशी दोन्ही सभागृहातून बहुसंख्य आमदारांच्या बहुमताने पारित झालेला होता.

गोरगरीब सामान्य जनतेच्या तळागाळापर्यंतच्या शेवटच्या घटकापर्यंत जनरल प्रॅक्टिशनर म्हणून होमिओपॅथिक सीसीएमपी डॉ. पोहोचावा यासाठी अनेक वर्षांपासून अहोरात्र कार्यरत असलेल्या बी एच एम एस सीसीएमपी डॉक्टरांना ऍलोपॅथीचे औषधी अधिकृतरित्या वापरता यावे यासाठी हा कायदा पारीत करण्यासाठी राज्यातील असंख्य आमदारांनी शासनाला सीसीएमपी उत्तीर्ण डॉक्टरांना एमएमसी त रजिस्ट्रेशन द्यावे असाच ठराव पारित केलेला होता.

परंतु अचानक आयएमए आणि काही ठराविक नेत्यांच्या दबावामुळे शासनाने दोन्हीही पॅथी च्या पदाधिकाऱ्यांची वस्तुस्थिती न समजून घेता समिती नेमण्याचा एकतर्फी निर्णय दिल्यामुळे बी एच एम एस सीसीएमपी डॉ. नाहक भरडले जात आहे.

या प्रमुख मागणी साठी जामनेर तालुका होमिओपॅथिक डॉक्टर्स असोसिएशन च्या माध्यमातून राज्याचे जलसंपदा तथा आपत्ती व्यवस्थापन मंत्री ना गिरीष महाजन यांच्या निवास्थानी ना महाजनांना निवेदन देत अधिवेशन सारख्या संवेदनशील काळात आपण सभागृहात सामान्य जनतेच्या आरोग्य रक्षणासाठी जिथे एमबीबीएस डॉक्टर पोहोचत नाही तिथे होमिओपॅथिक सीसीएमपी डॉ. अहोरात्र सेवा देतात अशा डॉक्टरांसाठी आपल्यासारख्या संवेदनशील जबाबदार मंत्र्यांनी सभागृहात आवाज उठवावा व आम्हास न्याय मिळवून द्यावा.

अशी मागणी जामनेर तालुका होमिओपॅथिक डॉक्टर्स असोसिएशन च्या माध्यमातून करण्यात आली या वेळी डॉ प्रशांत भोंडे,डॉ. के. एम. जैन, डॉ उमाकांत हिरामन पाटील,डॉ. शिवराम राठोड, डॉ. प्रफुल्ल अमृत धांडे,डॉ. जयश्री प्रफुल्ल धांडे,डॉ.प्रकाश परदेशी,डॉ पवन श्रीकांत पाटील, डॉ. सोनाली सिसोदिया,डॉ योगेश इंगळे, डॉ स्वप्नील जैन,डॉ अमर बारी,डॉ संदिप बारी,डॉ.अमोल पाटील, डॉ.दिप्ती श्रीश्रीमाळ यांच्यासह संघटनेचे डॉ.पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *