जामनेर(प्रतिनिधी)आज शौर्य भूमी पानिपत येथे शौर्य स्मारक समिती पानिपत मार्फत आयोजित २६४ व्या शौर्य दिन निमित्त पानिपतच्या तिसऱ्या युध्दात लढलेल्या मराठा सैन्यास केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांनी उपस्थित राहून आदरांजली वाहिली. सदर कार्यक्रमात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा.श्री.देवेंद्रजी फडणवीस यांच्या मंत्रमुग्ध करणाऱ्या भाषणाने आपला जाज्वल्य इतिहास अगदी डोळ्यासमोर उभा राहिला. मातृभूमीच्या रक्षणासाठी एका पिढीची मराठ्यांनी दिलेली आहुती इतिहास कधीही विसरणार नाही.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा.श्री.देवेंद्रजी फडणवीस यांच्या अध्यक्षते खाली हा कार्यक्रम पार पडला. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री श्री.प्रतापराव जाधव, केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे, माजी केंद्रीय राज्यमंत्री श्री.रावसाहेब पाटील दानवे, पणन व राजशिष्टाचार मंत्री श्री.जयकुमार रावल इ. मान्यवर उपस्थित होते.
Leave a Reply