जामनेर(प्रतिनिधी)शिक्षण विभाग पंचायत समिती जामनेर यांनी पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण वाढावे यासाठी मिशन शिष्यवृत्ती या उपक्रमांतर्गत इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी JTS (जामनेर तालुका टॅलेंट सर्च परीक्षा) वर्ष 3 रे आयोजित केलेली होती. त्या अनुषंगाने आज जामनेरसह तालुक्यातील 13 परीक्षा केंद्रांवर सुमारे २२०० विद्यार्थ्यांची चाचणी परीक्षा संपन्न झाली.
सदर परीक्षेसाठी मा. गिरीश भाऊ महाजन गिरीश भाऊ महाजन जलसंपदा मंत्री महाराष्ट्र राज्य व जे.के. फाउंडेशन गोद्री यांच्या संयुक्त विद्यमानाने जामनेर तालुक्यातील सर्व गोरगरिबी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची आवड निर्माण व्हावी व विद्यार्थ्यांना अतिरिक्त सराव मिळावा हा उदात्त हेतू या मागे आहे. विद्यार्थ्यांच्या स्पर्धा परीक्षेची तयारी करून घेतली जाते, देखील प्रथम सत्रापासूनच सर्व शिक्षक विद्यार्थ्यांची तयारी करून घेतात म्हणूनच जामनेर तालुक्याचा स्पर्धा परीक्षेतील टक्का निश्चितच वाढलेला आहे. खेड्यापाड्यात जिल्हा परिषद शाळा शिकणाऱ्या गोरगरिबांच्या व वंचित घटकांच्या मुलांची या उपक्रमाद्वारे स्पर्धा परीक्षेची विशेष तयारी करून घेतली जाते.
जामनेर येथील परीक्षा केंद्रावर जामनेर नगरपालिकेच्या नगराध्यक्षा साधनाताई महाजन, माजी कार्यकारी अभियंता शिक्षण विस्तार अधिकारी तथा शिक्षणाधिकारी मा.श्री.विजय सरोदे साहेब,.शालेय पोषण आहार अधीक्षक श्री. विष्णू काळे साहेब, केंद्रप्रमुख श्री. संदीप पाटील, यांच्यासह सुलभक टीमचे सर्व सदस्य,विषयतज्ज्ञ शिक्षक,पर्यवेक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते.
प्राथमिक शिक्षणाधिकारी विकास पाटील यांनी भावी आयुष्यातील स्पर्धा परीक्षांचे तयारी होते, एक चांगला व अभिनव उपक्रम जामनेर शिक्षण विभाग राबवित असल्याबाबत गटशिक्षणाधिकारी व सुलभक टीमचे कौतुक केले, सदरील उपक्रमासाठी योगदान देणारे जे.के फाउंडेशनचे देखील कौतुक केले.
याप्रसंगी बोलताना उपक्रमाचे आधारस्तंभ श्री जे. के. चव्हाण साहेब यांनी सांगितले की ग्रामीण भागातील बालगोपाळांनी या उपक्रमाचा आवर्जून लाभ घ्यावा. न सोडवता आलेल्या प्रश्नांवर शिक्षकांशी संवाद साधावा ,अपयश आल्यास पुढील प्रयत्नात अधिक अभ्यास करून यश मिळवावे अशा शुभेच्छा दिल्यात.
ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांचा स्पर्धा परीक्षा दृष्टीने सराव करून घेण्यासाठी हा अभिनव उपक्रम राबवण्यात येत आहे. या उपक्रमास जलसंपदात व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीषभाऊ महाजन यांची प्रेरणा असून त्यांच्या माध्यमातून जे.के. फाउंडेशन यांच्यामार्फत या परीक्षेचा संपूर्ण खर्च करण्यात येत आहे. यातील निवडक शंभर विद्यार्थ्यांना पुढील अंतिम परीक्षेसाठी निवडले जाऊन त्यांचा यथोचित गौरव करण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.
उपक्रम यशस्वीतेसाठी तालुका सुलभक टीमचे सदस्य प्रवीण कुऱ्हाडे सर, शरद वासनकर सर, कैलास पाटील सर,योगेश पाटील सर, हरीश पाटील सर, संदीप पाटील यांनी परिश्रम घेतले.
Leave a Reply