जामनेर (प्रतिनिधी)मा. भारत निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार मतदार यादी शुद्धीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. सदर मोहिमेच्या अनुषंगाने आज जामनेर तहसील कार्यालयात तालुकास्तरीय बैठक आयोजित करण्यात आली.
या बैठकीत सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी उपस्थित राहून मतदार यादीतील मयत, स्थलांतरित व दुबार मतदारांची नावे वगळणे तसेच नव्याने पात्र मतदारांची नावे समाविष्ट करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
तहसीलदार जामनेर यांचे अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सहायक निवडणूक नोंदणी अधिकाऱ्यांनी शुद्धीकरण मोहिमेचे नियम व प्रक्रिया स्पष्ट केली. सर्व पक्षांचे पदाधिकारी यांनी सहकार्य करण्याची ग्वाही दिली.
लोकशाही बळकट करण्यासाठी प्रत्येक मतदाराची नोंद अचूक असणे आवश्यक असून यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन तहसीलदार नानासाहेब आगळे यांनी सर्वपक्षीय कार्यकर्ते पदाधिकारी यांना केले.
Leave a Reply