जामनेर(प्रतिनिधी) 5 सप्टेंबर शिक्षक दिनाचे औचित्य साधूनयेथील संत साहित्याचे अभ्यासक आणि शंभरहून अधिक आध्यात्मिक ग्रंथांचे लेखक, कीर्तनकार, सेवानिवृत्त प्राध्यापक ह.भ.प. रामकृष्णा महाराज पाटील यांच्या आठ अध्यात्मिक ग्रंथांचा प्रकाशन सोहळा जामनेर येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. सेवानिवृत्त मुख्याध्यापक पी टी काळे यांच्या हस्ते आणि एस.टी. चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या सोहळ्याला गोविंद महाराज संस्थानचे प्रतापराव पाटील, सामाजिक कार्यकर्ते किशोर पाटील, बी.डी.लामखेडे, एसटी महामंडळाचे वाहतूक नियंत्रक संजीव कुमावत, ज्येष्ठ नागरिक सेवा संघाचे अध्यक्ष पं.ना.पाटील, उपशिक्षणाधिकारी विजय सरोदे यांच्यासह शेकडो नागरिक भाविक भक्त उपस्थित होते.
जामनेर येथील द्वारका दर्शन पार्कच्या प्रशस्त हॉलमध्ये संपन्न झालेल्या या विशेष प्रकाशन सोहळ्याला द्वारका दर्शन पार्क मधील रवी चौधरी, अंकुश चिंचोले, चेतन पाटील, योगीराज गरुड, जगदीश शेळके, पंकज पाटील, योगेश पाटील, रवींद्र पाटील, मुख्याध्यापक किरण काळे, प्रशांत पाटील, विजय पाटील, मराठा सेवा संघाचे अमोल पाटील , ग्राम विस्तार अधिकारी शरद कोळी आदी उपस्थित होते.
सेवानिवृत्त प्राध्यापक रामकृष्णा महाराज पाटील यांनी आतापर्यंत महाराष्ट्रातील सर्व संतांचे अभंग चरित्र, ज्ञानेश्वरीतील निवडक ओव्यांचे निरूपण, असे सुमारे शंभरहून अधिक आध्यात्मिक पुस्तके लिहिली आहे.
आज झालेल्या प्रकाशन समारंभात शौर्य शहाणपण आणि शहीदी एका संभाजी राजाची वीरगाथा, अभंग सरिता, ऋणशेष, भक्तीची साधना, उजेडाच्या पाऊलखुणा हा प्रबोधनात्मक कथासंग्रह, गीत शंकरायन, शब्दांमध्ये गुंफलेली नाती, जागर (प्रबोधनाचे अभंग) या आध्यात्मिक ग्रंथांचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.
प्रमुख अतिथी पी टी काळे यांनी सांगितले की जामनेरचे भाग्य आहे की रामकृष्ण महाराज पाटील यांच्यासारखे विचारवंत आपल्याला लाभले आहे त्यांच्या हातून अशा प्रकारे अध्यात्मिक ग्रंथांचे नित्य लेखन होत आहे.
प्रकाशन समारंभाच्या अध्यक्ष स्थानावरून बोलताना एस.टी.चौधरी यांनी सांगितले की दादा महाराज यांच्या विचाराने चालणारा मी त्यांचा कृपा पात्र साधक शिष्य आहे याचा मला अभिमान आहे. त्यांच्या लेखनात सामाजिक प्रबोधन मोठ्या प्रमाणात होत असते. वाचन संस्कृती पासून दूर चाललेल्या समाजाला आज खऱ्या अर्थाने प्रबोधनाच्या साहित्याची आणि ग्रंथांची आवश्यकता आहे. ही ग्रंथांची गरज भरून काढण्याचे काम प्राध्यापक रामकृष्ण महाराज पाटील करत आहे ही अभिमानाची गोष्ट आहे.
आध्यात्मिक ग्रंथांचे लेखक प्राध्यापक रामकृष्ण महाराज पाटील म्हणाले की आज लहान मुलांना संस्काराची अतिशय आवश्यकता आहे. लहान मुलांवर संस्कार दिले नाही तर पुढच्या भावी काळामध्ये त्यांचे भविष्य अंधकारमय होईल. शिक्षणासोबत संस्काराची आवश्यकता असून पालकांनी त्यांच्या मुलांना भारतीय संस्कृतीचे धडे, आध्यात्मिक ज्ञान देणे आवश्यक आहे. आमच्या हातून अध्यात्मिक लेखन होते आहे ही भगवंताची कृपा आहे असे त्यांनी नम्रपणे सांगितले.
या प्रकाशन सोहळ्याला यशस्वी करण्यासाठी राजू सरोदे, हेमंत तायडे, अभिषेक कुमावत, प्रकाश पाटील, मोहन मंगळकर, आशिष चव्हाण, स्टॅम्प वेंडर कैलास सोनवणे, नरेंद्र बुळे, हरीश सुभाष चौधरी यांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सेवानिवृत्त मुख्याध्यापक पी.टी.काळे यांनी केले. आभार प्रदर्शन जगदीश शेळके यांनी केले तर उत्कृष्ट सूत्रसंचालन प्रकाश पाटील यांनी केले.
Leave a Reply