जामनेर(प्रतिनिधी)वाचन संस्कृती वाढविण्यासाठी अनेक ग्रंथाचे तसेच पुस्तकांचे वाचन गरजेचे आहे असे प्रतिपादन जि. प. जळगाव पुरस्कार प्राप्त आदर्श शिक्षक तथा सेवानिवृत्त ग्रेडेड मुख्याध्यापक प्रभाकर तुकाराम पाटील (पी.टी.पाटील ) यांनी लहासर येथील जिल्हा परिषद मराठी शाळेत विद्यार्थ्यांनांसमोर बोलतांना सांगितले.
पी. टी.पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना सांगितले की, मोबाईल जास्त हाताळण्यापेक्षा पुस्तके हातात घेऊन त्यांचे वाचन करून वाचन कौशल्य वाढवावे. वाचनामुळे माणूस सुसंस्कृत बनतो. वाचनातून विद्यार्थी – लेखक, कवी यांचा परीसंवाद घडवून येतो. आपल्या आई – वडीलांसमोर अभ्यास करा आणि आपल्या आई – वडीलांनाच दैवत मानून त्यांची नित्यनेमाने आज्ञा पाळावी आणि त्यांना कामात मदत करावी. त्यांच्या कष्टाची जाणीव ठेवावी.
तरुण पिढीला ग्रंथ वाचनाकडे आकर्षित करणे व वाचन संस्कृती वाढविण्यासाठी वाचन संकल्प महाराष्ट्राचा या उपक्रमांतर्गत शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना “बाप” या संपादित केलेल्या काव्यसंग्रहाचे वाटप करण्यात मागचा उद्देश सांगितला.
यावेळी सेवानिवृत्त झाल्याबद्दल पी.टी.पाटील यांचा सत्कार शाळेच्या वतीने सरपंच शिवाजी पाटील यांच्या हस्ते शाल, गुलाबपुष्प देवून करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच शिवाजी पाटील, सेवानिवृत्त ग्रेडेड मुख्याध्यापक पी.टी.पाटील (शांतीसुत), पोलीस पाटील राहुल सुरवाडे, जेष्ठ नागरिक कौतीक पाटील, किसन जाधव हे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक प्रविण कुऱ्हाडे यांनी केले व सूत्रसंचालन उपशिक्षक निंबा पाटील यांनी केले आणि आभार प्रवीण पाटील यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उपशिक्षिका आश्विनी पाटील व विद्यार्थ्यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाला पालक व विद्यार्थी उपस्थित होते.
Leave a Reply