मतदार यादी पुनरीक्षण उत्कृष्टपणे पूर्ण केल्याबद्दल मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांचा प्रमाणपत्र देऊन गौरव


जामनेर(प्रतिनिधी)भारतीय संविधान 1947 मध्ये स्वातंत्र्यानंतर तीन वर्षांनी 1950 मध्ये 26 जानेवारी रोजी लागू करण्यात आले. त्याच्या एक दिवस आधी, म्हणजे 25 जानेवारी 1950 रोजी, निवडणूक आयोगाची स्थापना करण्यात आली, ज्यामुळे आज भारतीय निवडणूक आयोगाच्या स्थापना दिनी राष्ट्रीय मतदार दिन साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला

राष्ट्रीय मतदार दिवसाचे आयोजन जामनेर विधानसभा मतदार संघात आज राष्ट्रीय मतदार दिवस अनुषंगाने आज कार्यक्रम घेण्यात येऊन उपस्थित मतदारांना शपथ देण्यात आली.तसेच मतदार यादी पुनरीक्षण कामकाज उत्कृष्टपणे पूर्ण केल्याबद्दल मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांचा

प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. यात यादी भाग -१ सुरेश वामन गोपाळ यादी भाग – ५० विलास देवलाल तागवाले यादी भाग – ६८ विजय सुकराम कोळी यादी भाग – ८१ शेख बिलाल शेख अहमद यादी भाग -१०६ राजूसिंग पंचमसिंग चौधरी यादी भाग -११३ समाधान मारोती किरोते यादी भाग -१८५ साजिद अहमद अ.रशीद यादी भाग -२०२ मुकुंद भगवान वारंगे यादी भाग – २५८ संजीव त्र्यंबक बारी यादी भाग – ३३४ संतोष तुळशीराम वरखड यांनी मतदार यादी पुनरिक्षण कामकाज उत्कृष्ट केलेबद्दल

तहसील कार्यालयात तहसीलदार नानासाहेब आगळे, पोलीस निरीक्षक मुरलीधर कासार नायब तहसीलदार प्रशांत निंबोळकर, शिवदे मॅडम नायब तहसीलदार संजय गांधी शाखा किशोर माळी नायब तहसीलदार यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *