जामनेर (प्रतिनिधी)पुनर्रचित हवामानावर आधारित *“फळ पिक विमा योजना आंबिया बहार”* खरीप 2024 व रब्बी 2024-25 अंतर्गत विमा उतरविलेल्या पण बँक मार्फत पैसे वजा होऊन सुद्धा पीक विमा पोर्टल वर तांत्रिक कारणामुळे पैसे जमा न झालेल्या शेतकऱ्यांना लाभ देण्यासाठी, कृषी विभाग मार्फत दि.03 मार्च ते दि.13 मार्च 2025 दरम्यान बँकसाठी विशेष विंडो खुली करण्याचा निर्णय घेण्यात आलेला असून, संबंधित बँक शाखांनी सदर रक्कम चलन द्वारे अपलोड करून देण्याची आहे.
याबाबत केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांनी केंद्रीय कृषी विभाग यांच्याकडे याबाबत तक्रार केली असता, कृषी विभागाने विशेष निर्णय घेऊन बँक शाखांसाठी ही सवलत उपलब्ध करुन दिलेली असून, यामुळे ज्या विमा उतरविलेल्या शेतकऱ्याच्या खात्यातून विम्याचे पैसे वजा होऊन सुद्धा विमा कंपनी पोर्टल वर पैसे जमा न झालेले असल्याबाबत कळविण्यात येऊन, नुकसान झालेले असून सुद्धा पिक विम्याचा लाभ नाकारण्यात आला आहे अशा शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे. हे सर्व *केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे* यांनी प्रयत्नांनी शक्य होणार आहे.
Leave a Reply