जामनेर-(प्रतिनिधी)- आज दिनांक २०/०९/२०२५वार शनिवार रोजी जामनेर शहरातील सर्व दुर्गाउत्सव मंडळा सोबत महत्वपूर्ण विषयावर मा.ना.गिरीशभाऊ महाजन यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती त्यात येणारा नवरात्र उत्सव आनंदात व उत्साहात पार पाडण्यासाठी सर्व मंडळाची जबाबदारी आहे. म्हणून सर्वांनी धार्मिक उत्सवाचे पावित्र ठेवा असे आवाहन राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री नामदार गिरीश महाजन यांनी केले. जामनेर येथे सर्व दुर्गा उत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते.
नामदार महाजन पुढे म्हणाले की मंडळाच्या कार्यकर्त्यांनी सजावट देखावा स्वदेशी वर भर द्यावा ऑपरेशन सिंदूर सारखे देखावे सजावट करावे. भक्तिमय वातावरण राहील याची प्रत्येक मंडळाने काळजी घ्यावी जे मंडळ चांगले देखावे व मिरवणुकीत शिस्त चे पालन करतील अशा मंडळांना प्रथम लक्ष 51 हजार द्वितीय भक्षरी 31 हजार तृतीय बक्षीस 21 हजार चतुर्थ बक्षीस 11 हजार व उत्तेजनार्थ 5000 बक्षीस दिले जाईल अशी घोषणाही नामदार महाजन यांनी केली. देवी विसर्जन गंगापुरी वाघुर धरणावर क्रेनच्या सहाय्याने केले जाणार असून मंडळाच्या कार्यकर्त्यांनी सहकार्य करावे असे आवाहनही त्यांनी केले.
शिक्षण संस्थेचे सचिव जितेंद्र पाटील हे मार्गदर्शन करताना म्हणाले की मंडळाच्या कार्यकर्त्यांनी दिलेल्या वेळेतच मिरवणुका काढाव्यात. रात्री तीन चार वाजेपर्यंत मिरवणूक बघायला कोणीच नसते मग आपले कौतुक आपणच बघायचे का?असा प्रश्न उपस्थित करून शिस्तीत मिरवणुका निघाल्या पाहिजे असेही ते म्हणाले. भाजपा जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर मार्गदर्शन करताना म्हणाले की या वर्षापासून आपण मिरवणुकीचा मार्ग बदलविला असून कृषी उत्पन्न बाजार समिती पासून मिरवणुकीला सुरुवात होणार असून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक राजमाता जिजाऊ चौक अशी मिरवणूक राहणार असून प्रत्येक मंडळाला नंबर दिले जाणार आहेत. दिलेल्या नम्रनुसारच लाईनीत व वेळेत मिरवणूक काढावी असे आवाहनही त्यांनी केले.या बैठकीस भाजपा जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर,शिक्षण संस्थेचे सचिव जितेंद्र पाटील, पोलीस निरीक्षक मुरलीधर कासार,भाजपा जामनेर मंडळ अध्यक्ष रवींद्र झाल्टे,डॉ. प्रशांत भोंडे,जिल्हा सरचिटणीस आतिश झालटे,मुख्याधिकारी नितीन बागुल, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता चासकर, महावितरण चे लेले आदी मान्यवर उपस्थित होते.
Leave a Reply