जामनेर (प्रतिनिधी)नुकत्याच संपन्न झालेल्या तालुकास्तरीय अधिकारी व कर्मचारी सांस्कृतिक स्पर्धा २०२४-२०२५ वैयक्तिक गटातून जामनेर जि.प मराठी शाळेच्या पदवीधर शिक्षिका श्रीमती वर्षा मुकुंदा सुरवाडे यांचा सांस्कृतिक कार्यक्रमात लावणी कला विभागात प्रथम क्रमांक आला.तसेच जिल्हा स्तरावर सुध्दा कला विभागात उत्कृष्टरीत्या नृत्य मराठमोळी लावणी सादर केली. त्याबद्दल जि. प. मराठी शाळा जामनेर येथे सेवानिवृत्त मुख्याध्यापक पी.टी.पाटील यांनी शाल, बुके आणि माय, बाप, किलबिल काव्यसंग्रह देवून श्रीमती वर्षा सुरवाडे यांचा सत्कार केला.त्यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्रीमती वंदना पाटील, पदवीधर शिक्षक समाधान बाविस्कर, उपशिक्षक पंडित बाविस्कर सुर्यकांत मुंढे, श्रीमती स्नेहल पाटील तसेच शाळेतील विद्यार्थी उपस्थित होते.
Leave a Reply