
जामनेर(प्रतिनिधी)मा.जिल्हाधिकारी सो जळगाव यांचे कडील दि 31/12/2024 रोजीच्या परीपत्रकानुसार मातोश्री ग्रामसमृध्दी शेत/पाणंद रस्ते योजने अंतर्गत बारमाही वापरता येण्यासारखे कायमस्वरुपी रस्ते तयार करणे करीता कालबध्द कार्यक्रम रबविण्याचे निश्चित करण्यात आलेले आहे. त्याअनुषंगाने जामनेर तालुक्यातील एकुण 08 अतिक्रमीत रस्ते यापुर्वीच मोकळे करण्यात आलेले आहेत.
तसेच दिनांक 09/04/2025 रोजी मौजे लोणी ते मेहेगाव रस्ता मोकळा करणे बाबतची कार्यवाही पुर्ण करण्यात आलेली आहे. सदर रस्त्याची एकुण लांबी 3 कि.मी. आहे त्यापैकी जवळपास 1 कि.मी. पाणंद रस्ता आहे. त्यात 900 मीटर लांबीत शेतकऱ्यांच्या सहकाऱ्यांने रुंदीकरण करण्यात आले परंतु 300 मीटर लांबीत शेतकऱ्यांच्या हरकती मुळे काम होऊ शकले नाही. परंतु मा. तहसिलदार जामनेर यांनी समक्ष पाहणी करुन रस्त्याबाबतचा शेतकऱ्यांचा वाद मिटवला व रस्ता मोकळा करण्यात आलेला आहे सदर रस्ता मोकळा केल्यामुळे एकुण 40 ते 50 शेतकऱ्यांना रस्त्याचा लाभ झालेला आहे.
वरील प्रमाणे दिनांक 11/04/2025 पावेतो 09 अतिक्रमीत रस्ते मोकळे करण्यात आलेले आहेत.
Leave a Reply