छत्रपती शिवाजी महाराजांचे 12 किल्ले युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत जामनेर भाजपा कडून जल्लोष.


जामनेर (प्रतिनिधी) संपूर्ण देशवासियांचे आराध्यदैवत, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचे किल्लेवैभव असलेले 12 किल्ले हे युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट झाले आहेत. ‘अद्वितीय वैश्विक मूल्य’ म्हणून त्याचा आता समावेश करण्यात आला आहे. यात महाराष्ट्रातील 11 किल्ले रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, शिवनेरी, लोहगड, साल्हेर, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग, खांदेरी तसेच तामिळनाडूतील एक जिंजी या किल्ल्यांचा समावेश आहे.

देशभरातील शिवभक्तांसाठी आजचा आनंदाचा क्षण साकारला गेला असल्याच्या प्रतिक्रिया भाजपा जिल्हाध्यक्ष पूर्व चंद्रकांत बाविस्कर यांनी यावेळी दिल्या. राज्याचे जलसंपदा तथा आपत्ती व्यवस्थापन मंत्री ना गिरीश महाजन यांचे नेतृत्वात राजमाता जिजाऊ चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी जेष्ठ नेते जेके चव्हाण शिक्षण संस्थेचे सचिव जितेंद्र पाटील.

माजी उपनगराध्यक्ष प्राध्यापक शरद पाटील माजी गटनेते डॉक्टर प्रशांत भोंडे महामंत्री अतिश झाल्टे मंडळ अध्यक्ष रवींद्र झाल्टे मयूर पाटील भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष निलेश चव्हाण सर ज्येष्ठ नेते श्रीराम महाजन डॉक्टर संजीव पाटील युनुस शेख नामदार महाजनांचे स्वीय सहायक दीपक तायडे माधव चव्हाण सुभाष पवार सुहास पाटील यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते .

यावेळी ढोल ताशांच्या गजरात फटाके फोडून व पेढे वाटून जल्लोष साजरा करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *