जामनेर – (प्रतिनिधी )- राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री नामदार गिरीश महाजन यांच्या हस्ते शहरातील खुल्या जागेत वॉल कंपाऊंड, व लादी बसविणे अशा चार कोटी रुपयांचे भूमिपूजन व तीन कोटी रुपयांचे विकास कामांच्या लोकार्पण करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून भाजपा जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, शिक्षण संस्थेचे सचिव जितेंद्र पाटील, एडवोकेट शिवाजी नाना सोनार, माजी सरपंच शंकर मराठे, शहराध्यक्ष रवींद्र झाल्टे, गटनेते डॉ. प्रशांत भोंडे, नगरसेवक श्रीराम महाजन, बाबुराव हिवराळे,मुख्याधिकारी नितीन बागुल आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना नामदार गिरीश महाजन म्हणाले की, संपूर्ण राज्यात जामनेर तालुका सर्वच बाबतीत एक नंबर राहील. जामनेर शहराकडे एक मॉडेल म्हणून पाहिले जाईल असे शहर बनवण्याचा आपला संकल्प असून पंचवीस तीस एकर जागेवर 25 कोटी रुपये खर्च करून भव्य नाट्यगृह, चाळीस कोटी रुपये खर्च करून स्टेडियम व जिम अशा विविध कामांना आपण सुरुवात करत असून लवकरच हि कामे पूर्ण होतील. असं सांगून ते पुढे म्हणाले की भागपूर धरणातून 1600 कोटी रुपयांचे टेंडर मंजूर झाले असून पाईपलाईन द्वारे प्रत्येक शेतकऱ्याला पाणी मिळणार आहे.त्यामुळे शेंदुर्णी,पहूर, लोहारा, कळमसरा, अशा विविध भागातील शेतकऱ्यांच्या जीवनात अमूलाग्र बदल घडणार आहे.
तालुक्यातील यूपीएससी, एमपीएससी असे उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक एकर जागेवर ई सुविधा असलेली अद्यावत अभ्यासिका व वाचनालय उभारणार असून त्यासाठी दहा कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली अशी माहिती नामदार महाजनांनी
दिली. ना. गिरीश महाजन बोलताना म्हणाले की माझ्या राजकारणाची सुरुवात याच कॉलनीतील संतोषी मातेचे आशीर्वाद घेऊन झाली. सुरुवातीला जिल्हा परिषदेसाठी सौ साधनाताई महाजन जिल्हा परिषदेसाठी तसेच ग्रामपंचायत मध्ये प्रथमच गिरजा कॉलनी व बजरंगपुरा या भागातूनच प्रथम ग्रामपंचायत सदस्य येथूनच झालो हा माझा बालेकिल्ला असून भविष्यातही अशीच साथ आपल्या सर्वांची असणार आहे.
विधानसभेत मी तालुक्या बाहेर असताना देखील आपण मला निवडून दिल तसेच माझ्यावर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची पाच जिल्ह्यांची जबाबदारी असून याईवेळी माझ्या गैरहजरित तुम्हाला निवडणुका जिंकायचे आहेत असा विश्वासही नामदार महाजन यांनी यावेळी बोलून दाखविला.
यावेळी स्वामी विवेकानंद नगर मध्ये भव्य व्यायामशाळा, गिरजा कॉलनी, जळगाव रोड मधुबन कॉलनी,पाचोरा रोड, मुस्लिम मोहल्ला, वाकी रोडवरील लक्ष्मी कॉलनी जळगाव रोड वरील शिव कॉलनी अशा विविध भागातील खुल्या जागेत लादी बसविणे, व्यायाम शाळा, कुस्ती, आखाडा, जिम,अंगणवाडी, स्टेज, डोम, अशा विविध कामांचे भूमिपूजन व लोकार्पण नामदार महाजन यांच्या हस्ते करण्यात आले.
Leave a Reply