जामनेर (प्रतिनिधी) नेरी येथे समस्त भजनी मंडळींच्या वतीने भव्य कावड यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. यांत गावांतील समस्त भजनी मंडळींसोबत बरेच जेष्ठ नागरिक व युवा वर्ग या आयोजनबद्ध उपक्रमात मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते. यावर्षी १४ जुलैपासून श्रावण महिना सुरू झाला आहे. हा महिना भगवान शिवशंभोंना विशेष प्रिय आहे. आपल्या हिंदू धर्मग्रंथ आणि पुराणानुसार, श्रावण महिना भगवान शिव आणि माता पार्वती यांना समर्पित आहे. हा महिना भगवान शिवांना इतका प्रिय आहे की, पौराणिक मान्यतेनुसार, श्रावण महिन्यात देवी पार्वतीने तपश्चर्या करून भोलेनाथांना प्रसन्न केले आणि त्यांना पती म्हणून प्राप्त केले.
म्हणूनच भगवान भोलेनाथांना हा महिना खूप आवडतो. तुलसीदासजी सुद्धा रामचरित मानसमध्ये श्रावण महिन्याबद्दल मनसोक्तपणे मनभरून लिहतात. आवडी बाबतीत भोलेनाथांनी स्वतः हे पुराणात सांगितले आहे.
श्रावण महिना हा पाऊस आणि हिरवाईचा काळ आहे आणि तो खूप मनमोहक काळ आहे.असे म्हटले जाते की, श्रावण महिन्यातील प्रत्येक दिवस महत्त्वाचा असतो, म्हणून श्रावण महिन्यात सोमवार विशेष फळे देतो. श्रावण महिन्यात भगवान भोलेनाथांची पूजा करून जलाभिषेक, रुद्राभिषेक, जप इत्यादी केल्याने विशेष फळे मिळतात. या महिन्यात भगवान भोलेनाथांच्या कृपेने इच्छा पूर्ण होतात.
या श्रावण महिन्यात रामचरित मानस आणि रामनाम संकीर्तनाचे विशेष महत्त्व आहे. याचे औचित्य साधून सकाळी ९:०० वाजता या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नेरी तील युवा मंडळ व समस्त भजनी मंडळ, महीला मंडळाने देखील कावड यात्रेत कावड घेवून जय महाकाल व शिवशंभोच्या गजरात तपोवन चिंचखेडा रस्त्यावरून कावड घेवून नियोजनात्मक आठवडेबाजार क्षेत्रातील महादेव मंदिर तथा विठ्ठल मंदिरापर्यंत कावड यात्रा पुर्ण केली. यासाठी ह.भ.प.अशोक महाराज बाविस्कर,नत्थु वाघ,सुरेश चौधरी,बाळू गोतमारे,संदीप खोडपे,संभाजी पाटील,किशोर खोडपे,भगवान इंगळे,गौरव खोडपे,रवींद्र पाचपोळे,संभाजी ईधाटे,सीताराम खोडपे,प्रभूदास इधाटे, श्याम खोडपे,नाना इधाटे,कल्पेश बेलदार,संजय सेवक,प्रशांत कुमावत,सचिन न्हावी, गोविंदा काळे,समाधान पाटील,अशोक धनगर,भैया पाटील गावातील महिला वर्ग व ग्रामस्थांनी सहकार्य केले.
Leave a Reply